कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांचा मुलगा निखिल लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. निखिल कुमारस्वामीचा रेवती बरोबर साखरपुडा झाला आहे. रेवती काँग्रेस नेत्याची भाची आहे. सहा फेब्रुवारीला निखिलने रेवती सोबतचा त्याचा फोटो फेसबुक अकाऊंटवर शेअर केला होता.
ताज वेस्ट एन्ड हॉटेलमध्ये हा साखरपुडा सोहळा संपन्न झाला. निखिलचे आजोबा आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा या साखरपुडयाला उपस्थित होते. निखिल ३० वर्षांचा असून त्याने २०१६ साली ‘जॅग्वार’ या चित्रपटातून कन्नड चित्रपट सृष्टीत पदार्पण केले.
निखिल लवकरच नव्या चित्रटासाठी चित्रीकरण सुरु करणार आहे. निखिलने २०१९ साली मांडयामधून लोकसभेची निवडणूक लढवली होती. सुमालता अंबरीश यांनी त्याला पराभूत केले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 10, 2020 3:51 pm