News Flash

Himachal Pradesh Elections results 2017: काँग्रेसचा पराभव, भाजपला स्पष्ट बहुमत

माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह विजयी

वीरभद्र सिंह

हिमाचल विधानसभा निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यामध्ये भाजपने अपेक्षेप्रमाणे बाजी मारली. भाजपचे उमेदवार ४४ जागांवर विजयी झाले. तर काँग्रेस पक्ष २१ जागांवर समाधान मानावे लागले. याशिवाय, २ जागांवर अन्य पक्षांचा विजय झाला. हिमाचल प्रदेश विधानसभेत बहुमतासाठी एकूण ६८ जागांपैकी ३५ जागांवर विजय मिळवणे आवश्यक होते. भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले. विशेष म्हणजे भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा प्रेमकुमार धुमल यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

या निकालामुळे हिमाचल प्रदेशच्या जनतेने पुन्हा एकदा काँग्रेस- भाजपला आलटून पालटून सत्ता देण्याचा पॅटर्न कायम राखला. याशिवाय, या विजयामुळे भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये आणखी एका राज्याची भर पडली आहे. यामुळे आता भाजपची सत्ता असलेल्या राज्यांची संख्या १९ वर गेली आहे. तर काँग्रेसच्या हातातून आणखी एक राज्य गेले आहे.

गुजरातच्या तुलनेत कमी जागा आणि ग्लॅमर असल्यामुळे हिमाचल प्रदेशची निवडणूक काहीशी झाकोळली गेली होती. मात्र, तरीही राष्ट्रीय पातळीवर घरघर लागलेल्या काँग्रेससाठी ही निवडणूक अस्तित्त्वाची लढत होती. या निवडणुकीत काँग्रेसविरोधातील अँटी-इन्कम्बसी फॅक्टर, विकासाचा मुद्दा घेऊन भाजपने केलेला प्रचार, मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप, स्थानिक नेत्यांमधील बेबनाव हे घटक महत्त्वपूर्ण ठरले.

Gujarat election results 2017 live गुजरातमध्ये ९० जागांवर भाजपची आघाडी

हिमाचल प्रदेशात मतदार दर पाच वर्षांनी सरकार बदलतात असा गेल्या दोन-अडीच दशकांचा अनुभव आहे. त्यामुळे यंदा भाजपला सत्तेवर येण्याची संधी जास्त होती. जनमत चाचण्यांमध्येही भाजपा ४५ जागांच्या आसपास जाईल असाच अंदाज वर्तवण्यात आला होता. काँग्रेसने मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या नावावरच निवडणूक लढवली. ८३ वर्षीय वीरभद्र यांनी ही शेवटची निवडणूक असल्याचे भावनिक आवाहन मतदारांना केले. तपास संस्थांनी चौकशीचा ससेमिरा मागे लावला आहे. तसेच खातीही गोठविल्याने प्रचाराला पैसेही नाहीत, असे आवाहन संस्थानिक असलेल्या वीरभद्र यांनी केले होते. काँग्रेसकडे भाजपाच्या तुलनेत प्रचारात साधनांची कमतरता होती. सबकुछ वीरभद्र हेच चित्र होते. भाजपाने त्यांच्या विरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपांचा मुद्दा प्रचारात केंद्रस्थानी ठेवला होता. काँग्रेसने दिल्लीतून प्रचाराची फारशी कुमक त्यांच्या दिमतीला दिली नाही. उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या जेमतेम दोन सभा झाल्या. त्यांनी आपले लक्ष गुजरातवर केंद्रित केले आहे. त्या तुलनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा तर भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी सात सभा घेतल्या. ७३ वर्षीय प्रेमकुमार धुमल यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषित करून भाजपाने यंदा रणनीती बदलली होती. मात्र, दोन्ही पक्षांमधील अंतर्गत गटबाजी या लढतीत निर्णायक ठरू शकते. काँग्रेसचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह आणि सुखविंदर सिंग सुधू यांच्यात टोकाचा संघर्ष होता. तर प्रेमकुमार धुमल यांच्याकडे नेतृत्त्व दिल्यावरून खासदार शांताकुमार व केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा नाराज होते.

अपडेटस्

*भाजप २१ जागांवर विजयी

*हा विजय म्हणजे काँग्रेसवर जनतेने दाखवलेल्या विश्वासाचे प्रतिक- रजिंदर राणा

*माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह अर्कीतून विजयी

*आम्ही आमच्या चुकांचे आत्मपरीक्षण करु- विक्रमादित्य सिंह

*धुमल यांचा पराभव निराशाजनक असला तरीही भाजपला जनतेने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत- धर्मेंद्र प्रधान

*मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार असणाऱ्या प्रेमकुमार धुमल यांचा पराभव

*भाजप १७  जागांवर विजयी

*४४ जागांनी आघाडीवर असलेल्या भाजपचा ११ जागांवर विजय

*भाजप ९ जागांवर विजयी, काँग्रेस ५ तर इतर पक्षांच्या वाट्याला एक जागा.

*हिमाचल प्रदेशात कमळ फुलले

*माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह आघाडीवर

*भाजप कार्यकर्त्यांनी हिमाचल प्रदेशमध्ये पक्षाच्या वाट्याला आलेले यश साजरा करण्यास सुरुवात केली आहे.

*हिमाचल प्रदेश निवडणुकांचे निकाल हाती येण्यास सुरुवात होताच चौकाचौकात जनतेने निकाल पाहण्यासाठी गर्दी करण्यास सुरुवात केली.

*भाजपचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार प्रेमकुमार धुमल १७०९ मतांनी पिछाडीवर

 

* भाजपची बहुमताच्या दिशेने वाटचाल; ४० जागांवर आघाडी
*भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर; भाजप २३ तर काँग्रेस १४ जागांवर आघाडीवर

* भाजप १८ तर काँग्रेसला ११ जागांवर आघाडी

* भाजपची १६ जागांवर आघाडी; १० जागांवर काँग्रेस तर दोन जागांवर अपक्ष आघाडीवर
* सुरुवातीच्या टप्प्यात भाजप ७ तर काँग्रेसची तीन जागांवर आघाडी
* हिमाचल प्रदेश निवडणुकीचे कल हाती येण्यास सुरुवात; भाजप ३ जागांवर तर काँग्रेसला २ जागांवर आघाडी

* विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात
* थोड्याचवेळात होणार मतमोजणीला सुरुवात

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2017 7:40 am

Web Title: himachal pradesh assembly elections 2017 live blog updates bjp congress virbhadra singh premkumar dhumal
Next Stories
1 गुजरातचा कौल कुणाला?
2 ‘तोयबा, जमातचे दहशतवादी देशभक्तच’
3 सुखोई विमानांवर ब्रह्मोस क्षेपणास्त्रे बसवण्याची प्रक्रिया सुरू
Just Now!
X