23 September 2020

News Flash

राहुल गांधींना खासदार म्हणून निवडणं हा केरळवासियांचा विनाशकारी निर्णय-रामचंद्र गुहा

इतिहासकार रामचंद्र गुहा यांची राहुल गांधींवर टीका

राहुल गांधी यांना खासदार म्हणून निवडणं हा केरळवासियांचा विनाशकारी निर्णय होता अशी टीका इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी केली आहे. गांधी घराण्याच्या पाचव्या पिढीचे सदस्य राहुल गांधी यांचे कोणतेही आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर नाही असंही गुहा यांनी म्हटलं आहे. स्वातंत्र्य संग्रामाच्या वेळी महान पक्ष असलेला काँग्रेस हा आज दयनीय घराणेशाही कंपनी झाला आहे. भारतात अंधराष्ट्रीयता वाढीला लागल्याने हे घडलं आहे असंही गुहा यांनी म्हटलंय. राष्ट्रभक्ती विरोधात अंधराष्ट्रभक्ती या विषयावर इतिहासकार रामचंद्र गुहा यांचे व्याख्यान केरळ साहित्य संमेलनात आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी राहुल गांधींवर टीका केली.

“व्यक्तीगत पातळीवर माझं राहुल गांधी यांच्यासोबत कोणतंही शत्रुत्व नाही. ते एक शांत आणि सभ्य व्यक्ती आहेत. मात्र सध्याची तरुणाई घराणेशाहीला कंटाळली आहे. त्यांना गांधी घराण्याची पाचवी पिढी नको आहे. जर 2024 मध्ये तुम्ही पुन्हा एकदा राहुल गांधींनाच निवडून देण्याची चूक केलीतर तर त्याचा फायदा कदाचित नरेंद्र मोदींनाच होईल. भारताच्या जडणघडणीत केरळचं योगदान मोठं आहे. मात्र राहुल गांधींना निवडण्याचा निर्णय विनाशकारी होता”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2020 10:22 am

Web Title: historian ramchandra guha said kerala did disastrous job by electing rahul gandhi scj 81
Next Stories
1 CAA वरुन मागे हटण्याची गरज नाही-मोहन भागवत
2 देशात दोनच मुलं जन्माला घालण्याचा कायदा आणणं आवश्यक-मोहन भागवत
3 delhi assembly elections : दिल्ली विधानसभेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर
Just Now!
X