08 March 2021

News Flash

“आणखी किती शेतकऱ्यांना बलिदान द्यावं लागेल?”

मोदी सरकारला राहुल गांधी यांचा संतप्त सवाल

संग्रहीत

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात मागील काही दिवसांपासून सुरू असलेले शेतकरी आंदोलन दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत आहे. शेतकरी संघटना आपल्या मागण्यांवर ठाम असून, आता या आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचे शेतकऱ्यांनी ठरवले आहे. शिवाय, शेतकरी संघटनांनी सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससह विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर सातत्याने टीका सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

”कृषी कायदे हटवण्यासाठी आमच्या शेतकरी बांधवांना आणखी किती बलिदान द्यावे लागेल?” असा प्रश्न त्यांनी ट्विटद्वारे केंद्र सरकारला विचारला आहे.

काँग्रेसने म्हटले आहे की, कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान आतापर्यंत ११ शेतकऱ्यांना आपला जीव गमावावा लागला आहे. मात्र तरीही केंद्र सरकारच्या हृदयास पाझर फुटलेला नाही.

शेतकरी आज करणार ‘चक्का जाम’; दिल्ली-जयपूर महामार्ग ठप्प करण्याचा निर्णय

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या संवैधानिक वैधतेला आव्हान देणाऱ्या प्रलंबित याचिकांमध्ये पक्षकार करण्याच्या मागणीसाठी भारतीय किसान युनियनने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

केंद्र सरकारने केलेले नवे कृषी कायदे असंवैधानिक, शेतकरीविरोधी आहेत. या कायद्यांमुळे मोठय़ा कंपन्या आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या लालसेपुढे शेतकरी हतबल ठरेल. हे कायदे शेतक ऱ्यांच्या हिताचे नाहीत, तर त्यामागे कंपन्यांचे हित साधण्याचा कुटिल हेतू आहे, असे भारतीय किसान युनियनने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत नमूद केले आहे.

शेतकऱ्यांचा मोदी सरकारवरचा विश्वास उडाला-राहुल गांधी

या अगोदर कृषी कायदे रद्द करावेत यासाठी बुधवारी राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, डाव्या पक्षांचे नेते सीताराम येचुरी यांच्यासह पाच नेत्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका करत शेतकऱ्यांचा मोदी सरकारवरचा विश्वास उडाला असल्याची टीका केली होती. तसेच, कृषी कायदे हे देशातल्या शेतकऱ्यांचं हित साधणारेच आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं. असं असेल तर मग आज शेतकरी रस्त्यावर का आहेत? आपल्या देशातला शेतकरी हा देशाच्या जडणघडणीतला एक जबाबदार घटक आहे. तो मागे हटणार नाही आणि घाबरणार नाही असंही राहुल गांधी यांनी त्यावेळी म्हटलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2020 1:51 pm

Web Title: how many more farmers will have to sacrifice to repeal the agricultural laws rahul gandhi msr 87
Next Stories
1 मी कृषी क्षेत्राच्या विकासाआड येणाऱ्या सर्व भिंती पाडतोय : पंतप्रधान मोदी
2 दोन गटांमधील भांडण सोडवणाऱ्या युवकालाच भोसकलं, शरीरावर झाले २२ वार
3 Samsung चा चीनला झटका; ४,८२५ कोटींच्या गुंतवणुकीसह भारतात उभारणार प्रकल्प
Just Now!
X