हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना ठार झाले आहेत. पोलीस एन्काऊंटरमध्ये चारही आरोपी ठार झाले आहेत. अधिक तपासासाठी घटनास्थळी नेत असताना त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांकडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला.
ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी अधिक तपासाठी चारही आरोपींना नेण्यात आलं होतं. राष्ट्रीय महामार्ग ४४ वर त्यांना नेण्यात आलं होतं. त्या ठिकाणी क्राईम सीन रिक्रिएट करण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यावेळी आरोपींना पोलिसांवर हल्ला केला आणि त्यावेळी घटनास्थळावरून जाण्याचा प्रयत्न केला यानंतर पोलिसांकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला असल्याची पोलीस सूत्रांकडून देण्यात आली.

तेलंगणची राजधानी असलेल्या हैदराबाद येथे महिला पशुवैद्यकावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्यानंतर हत्या आणि नंतर मृतदेह जाळून देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर याप्रकरणातील चार जणांना अटक करण्यात आली होती.

आणखी वाचा- #HyderabadHorror : आरोपींनी तोंड दाबून ठेवल्याने मदतही मागू शकली नाही तरुणी, पोलीस तपासात धक्कादायक खुलासे

याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली होती. आरोपींची चौकशी केली असता अनेक धक्कादायक खुलासे झाले होते. पीडित तरुणीचा आवाज कोणालाही ऐकायला जाऊ नये यासाठी आरोपींनी गुन्हा करत असताना तिचं तोंड दाबून ठेवलं होतं. श्वास घेऊ न शकल्यामुळेच गुदमरुन पीडित तरुणीचा मृत्यू झाला. दरम्यान पोलिसांनी अजून एक खुलासा केला होता. पीडित तरुणीला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी आरोपींनीच कट रचत तिच्या स्कुटीमधून हवा काढली होती.

सामूहिक बलात्कारावेळी पीडित तरुणीने मदतीसाठी आरडाओरड करण्यास सुरुवात केली होती. आरोपींना यामुळे आपण पकडले जाऊ अशी भीती वाटू लागली होती. याचवेळी एका आरोपीने आवाज कोणालाही ऐकू जाऊ नये यासाठी पीडित तरुणीचं तोंड दाबून ठेवलं. यावेळी श्वास घेऊ न शकल्याने गुदमरुन पीडित तरुणीचा मृत्यू झाला.

स्कुटी दुरुस्त करण्याच्या बहाण्याने घेऊन गेले
बुधवारी संध्याकाळी चारही आरोपींनी पीडित तरुणी टोल प्लाजावर स्कुटी उभी करत असल्याचं पाहिलं होतं. यानंतर आरोपींनी सामूहिक बलात्काराचा कट रचला. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणी आपली स्कुटी घेण्यासाठी परतली असता पंक्चर झालं असल्याचं तिने पाहिलं. पोलिसांनी सांगितल्यानुसार, आरोपींनीच तरुणीच्या स्कुटीमधील हवा काढली होती. पीडित तरुणी पंक्चर झाल्यामुळे चिंतेत होती. यावेळी एक आरोपी मदत करण्याचा बहाणा करत तिथे पोहोचला. त्याचा हेल्पर स्कुटी दुरुस्त करुन देतो सांगत काही दूर घेऊन गेला.

यानंतर पीडित तरुणीवर जबरदस्ती करत निर्जनस्थळी नेण्यात आलं. तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. हैदराबादमधील या घटनेमुळे देशभरात संताप व्यक्त होत होता. ही निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती असल्याचं अनेकजण म्हणत आहेत. सोशल मीडियापासून ते सगळीकडेच याप्रकरणी आवाज उठवण्यात येत असून आरोपींना कडक शिक्षा केली जावी अशी मागणी होत होती. तसंच पीडित महिलेच्या आईने सर्व आरोपींना जिवंत जाळून टाका अशी मागणी केली होती.