26 February 2021

News Flash

‘माझा आता विवाह होण्याची शक्यताच नाही’

आपला अद्याप विवाह झालेला नाही आणि आता विवाह होण्याची शक्यताही नाही, असे केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी लोकसभेत स्पष्ट करताच सभागृहात हास्याची लकेर उमटली

| August 14, 2015 03:38 am

आपला अद्याप  विवाह झालेला नाही आणि आता विवाह होण्याची शक्यताही नाही, असे केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी लोकसभेत स्पष्ट करताच सभागृहात हास्याची लकेर उमटली. केंद्रीय मंत्री उमा भारती यांना सभागृहात निवेदन सादर करण्यास सांगताना लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी त्यांचा (भारती यांचा) उल्लेख श्रीमती असा केला. तेव्हा उमा भारती त्वरित म्हणाल्या की, आपण अद्यापही विवाहित नाही आणि विवाह होण्याची आता शक्यताही नाही. आता ‘नो व्हेकन्सी’चा फलक लागलेला आहे. या नंतर महाजन यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि आपले म्हणणे सुधारले. मात्र उमा भारती यांच्या विधानाने लोकसभेत हास्याची लकेर मात्र उमटली. उमा भारती यांचा अनेकदा साध्वी असा उल्लेख केला जातो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2015 3:38 am

Web Title: i have not married yet says uma bharti
Next Stories
1 बगदादमधील बॉम्बस्फोटात ६७ जणांचा मृत्यू
2 गोदामातील स्फोटात चीनमध्ये ५० ठार
3 बिहारमधील निवडणुकीसाठी राष्ट्रवादीला तीनच जागा
Just Now!
X