भारतीय हवाई दलाचे जग्वार विमान कच्छ जिल्ह्य़ात बिब्बेर खेडय़ात कोसळले. त्यात वैमानिकाने सुखरूप सुटका करून घेण्यात यश मिळवले. भुज येथील हवाई तळावरून उड्डाण केल्यानंतर हे जग्वार विमान बिब्बेर खेडय़ात कोसळले. हे गाव विमानतळापासून ३० कि.मी. अंतरावर आहे असे भारतीय हवाई दलाच्या सूत्रांनी सांगितले.
कच्छ पश्चिमचे पोलिस अधीक्षक डी.एन.पटेल यांनी सांगितले, की कच्छ जिल्ह्य़ात नखतारना तालुक्यात बिब्बेर येथे लढाऊ विमान कोसळल्याच समजले असून वैमानिक सुरक्षित आहे. २०१३ मध्ये दोन मिग २९ विमाने जून व जुलैत कोसळली होती. गेल्या तीन वर्षांत भारतीय हवाई दलाची २० विमाने कोसळली असून त्यात तांत्रिक व मानवी चुका ही कारणे आहेत.
 आतापर्यंत आठ मिग २१, चार जग्वार, तीन मिग २९, दोन सुखोई एसयू एमकेआय, दोन मिराज २००० व एक मिग एमएल अशी विमाने कोसळली आहेत.