07 April 2020

News Flash

काँग्रेस सत्तेवर आल्यास निमलष्करी जवानांनाही शहिदांचा दर्जा- राहुल

जेएलएन स्टेडियम येथे विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी राहुल गांधी यांनी संवाद साधला

राहुल गांधी (संग्रहित छायाचित्र)

आपले सरकार सत्तेवर आल्यास कर्तव्य बजावताना शहीद होणाऱ्या निमलष्करी दलाच्या जवानांना शहिदांचा दर्जा देण्यात येईल, असे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी येथे जाहीर केले.

जेएलएन स्टेडियम येथे विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी राहुल गांधी यांनी संवाद साधला त्या वेळी विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये गांधी यांनी वरील बाब जाहीर केली. निमलष्करी दलाच्या जवानांना शहिदांचा दर्जा दिला जात नाही, मात्र त्यांना तो मिळावयास हवा, आमचे सरकार आल्यास तो दर्जा दिला जाईल, असे गांधी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2019 1:27 am

Web Title: if the congress comes to power the rank of martyrs for paramilitary personnel says rahul
Next Stories
1 पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आज प्रारंभ
2 लढा दहशतवादाविरुद्ध, काश्मिरींविरुद्ध नाही
3 ‘बेरोजगारी ही समस्या असल्याचे स्वीकारण्यासच मोदी सरकारचा नकार’
Just Now!
X