केंद्रीय मनुष्यबळविकासमंत्री स्मृती इराणी यांची लोकसभेत माहिती 

संस्कृत साहित्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे प्रतिबिंब उमटले असल्याने विज्ञान-तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी आयआयटीसारख्या संस्थांमध्ये संस्कृत भाषा शिकविण्यास सांगण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळविकासमंत्री स्मृती इराणी यांनी सोमवारी लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली.

संस्कृत साहित्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे प्रतिबिंब उमटले असल्याने आयआयटीसारख्या संस्थांनी संस्कृत भाषा आणि त्याबरोबरच आधुनिक विषयांची सांगड घालून आंतरशाखीय अभ्यासक्रम सुरू करावा, अशी सूचना माजी मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपाळस्वामी यांच्या अध्यक्षतेखालील पथकाने अहवालात केली आहे.