अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सरदार पटेल स्टेडिअमवरील ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमात बोलताना भारताचे भरभरुन कौतुक केले. पंतप्रधान मोदींवरही स्तुतीसुमने उधळली.

ट्रम्प यांच्या भाषणातील दहा प्रमुख मुद्दे

– अमेरिकेचे भारतावर प्रेम आहे. अमेरिका भारताचा आदर करते. भारतीय जनतेचे आम्ही प्रामाणिक आणि निष्ठावान मित्र आहोत. मी आणि फर्स्ट लेडी हाच संदेश देण्यासाठी इथे आलो आहोत.

– भारतात आज झालेले आमचे आदिरातिथ्य आम्ही कायम लक्षात ठेऊ, आमच्या ह्दयात भारताचे विशेष स्थान आहे.

– पंतप्रधान मोदी यांनी चहा विकून सुरुवात केली. प्रत्येकाचे त्यांच्यावर प्रेम आहे. पण मी तुम्हाला सांगतो, ते खूप कठोर आहेत.

– पंतप्रधान मोदी तुम्ही फक्त गुजरातचे अभिमान नाही तर, मेहनत, समर्पण यांचे जिवंत उदहारण आहात. भारताला जे काही हवे, ते भारतीय साध्य करु शकतात.

– पंतप्रधान मोदींसोबत वाटाघाटी करणे सोपे नसल्याचे ट्रम्प यांनी मान्य केले.

– पृथ्वीवर सर्वत्र बॉलिवूड चित्रपट पाहण्याचा आनंद घेतला जातो. डीडीएलजे आणि शोले या चित्रपटांचा त्यांनी उल्लेख केला. सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

– भारताबरोबरचे संरक्षण संबंध आम्ही बळकट करणार आहोत. शत्रूच्या मनात धडकी भरवणारी पृथ्वीवरील उत्तम शस्त्रास्त्रे आम्ही भारताला देऊ. आम्ही उत्तम शस्त्रांची निर्मिती करतोय आणि भारताबरोबर आमचा व्यापार सुरु आहे.

– इस्लामिक दहशतवादापासून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी दोन्ही देश कटिबद्ध आहेत. आम्ही आज इसिसला १०० टक्के संपवले आहे. अल बगदादी ठार झाला आहे.

– दहशतवादी आणि त्यांच्या विचारधारेविरोधात लढण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पाकिस्तानसोबत आमचे संबंध चांगले आहेत. दहशतवाद संपवण्यासाठी माझे सरकार पाकिस्तानसोबत मिळून काम करत आहे.

– आमच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी आम्ही एकत्र काम करत आहोत. घुसखोरांपासून सीमा सुरक्षित करण्याचा प्रत्येक देशाला अधिकार आहे.