News Flash

राष्ट्रपती कोविंद यांच्या प्रकृतीत सुधारणा

कोविंद यांना सकाळी छातीत दुखण्याचा त्रास होऊ लागताच त्यांना लष्कराच्या रुग्णालयात नेण्यात आले.

संग्रहित

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना शुक्रवारी सकाळी छातीमध्ये त्रास जाणवल्याने त्यांची येथील लष्कराच्या रुग्णालयात तपासणी करण्यात आली. त्यांच्या वैद्यकीय चाचण्या करून निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती लष्कराच्या (आर्मी रिसर्च अ‍ॅण्ड रेफरल) रुग्णालयातर्फे देण्यात आली.

कोविंद यांना सकाळी छातीत दुखण्याचा त्रास होऊ लागताच त्यांना लष्कराच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांच्या आवश्यक त्या तपासण्या केल्यानंतर वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले, असे या रुग्णालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती कोविंद यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून प्रकृतीची विचारपूस केली. पंतप्रधान सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2021 12:37 am

Web Title: improvement in the health of president kovind abn 97
Next Stories
1 देशात आणखी ५९,११८ जणांना करोनाची लागण
2 दहशतवादाच्या प्रतिकारासाठी भारत-बांगलादेशाने एकत्र यावे- मोदी
3 शेतकऱ्यांच्या भारत बंदला संमिश्र प्रतिसाद
Just Now!
X