25 November 2020

News Flash

श्रीनगरमध्ये पहिल्यांदाच सीआरपीएफच्या दहशतवादविरोधी मोहिमेची सूत्रं IPS महिलेच्या हाती

श्रीनगर सेक्टरमध्ये सीआरपीएफच्या महानिरीक्षक म्हणून आयपीएस चारू सिन्हा यांना जबाबदारी

श्रीगरमधील दहशतवाद्यी कारवायांच्या बिमोड करण्यासाठी आता सीआरपीएफने प्रथमच एका महिला अधिकाऱ्याकडे दहशतवाद विरोधी अभियानाचे नेतृत्व करण्याची संधी दिली आहे. सन १९९६ च्या बॅचमधील तेलंगण केडरच्या आयपीएस अधिकारी चारू सिन्हा आता श्रीनगर सेक्टरमध्ये सीआरपीएफच्या महानिरीक्षक (आयजी) म्हणून काम पाहणार आहेत.

या अगोदर देखील चारू सिन्हा यांना अशाचप्रकारच्या कठीण कामासाठी जबाबदारी देण्यात आलेली आहे. सीआरपीएफच्या आयजी म्हणून त्यांनी बिहारमध्ये नक्षलवाद्या अभियानाचे नेतृत्व करत, नक्षलवाद्याचा बिमोड केला आहे. त्यांच्या नेतृत्वात नक्षलवादाविरोधात अनेक अभियान यशस्वीरित्या राबवले गेले आहेत. त्यानंतर त्यांची बदली जम्मू येथे बीएसएफच्या आयजी म्हणून झाली. या ठिकाणी देखील त्यांनी यशस्वीपणे कामगिरी पार पाडली. त्यांच्या कामगिरी पाहून आता त्यांना दहशतवाद्याचा बिमोड करण्यासाठी श्रीनगर सेक्टरच्या आयजी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या अगोदर श्रीनगर सेक्टरच्या आयजी पदाची जबाबदारी एपी माहेश्वरी यांच्याकडे होती.

सीआरपीएफच्या श्रीनगर सेक्टरमध्ये काश्मीरलगतचे तीन जिल्हे गांदरबल. बडगाम आणि श्रीनगरसह केंद्रशासीत प्रदेश लडाखचा देखील समावेश होतो. वर्ष २०१५ मध्ये सुरू करण्यात आलेल्या या सेक्टरमध्ये पहिल्या आयपीएस महिला असतील ज्यांना दहशतवादग्रस्त या भागांमध्ये सीआरपीएफच्या अभियानांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे.

या सेक्टरमध्ये दोन रेंज, २२ कार्यकारी युनिट आणि तीन महिला कंपनी येतात. याशिवाय श्रीनगर सेक्टरचा ग्रुप सेंटर-असलेल्या श्रीनगरवर प्रशासकीय नियंत्रण देखील आहे. या भागात होणाऱ्या सर्व अभियानांचे नेतृत्व चारू सिन्हा यांच्याकडे असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2020 1:59 pm

Web Title: in a first female ips officer to head terrorist hit srinagar sector for crpf msr 87
Next Stories
1 भारत चीन सीमेवर तणाव; दोन्ही बाजूचे रणगाडे एकमेकांच्या फायरिंग रेंजमध्ये
2 सुरेश रैनावर संकटांचा डोंगर, काकांच्या मृत्यूनंतर चुलत भावाचंही निधन
3 कर्जफेड स्थगिती दोन वर्षांपर्यंत वाढू शकते, केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात माहिती
Just Now!
X