श्रीलंकेतील मानवी हक्कांच्या उल्लंघन प्रकरणी संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क आयोगात अमेरिकेने पुरस्कृत केलेल्या ठरावावर भारताने गुरुवारी तटस्थतेची भूमिका घेतली. या ठरावाच्या बाजूने २३ तर विरोधात १२ मते पडली. १२ देश तटस्थ राहिले.
यासंदर्भात आयोगाची भूमिका घुसखोरीची असल्याचे सांगत आपण या ठरावासंदर्भात तटस्थ धोरण स्वीकारल्याची माहिती भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी दिलीप सिन्हा यांनी दिली.