भारताने आयात दूध व दुग्धजन्य पदार्थ तसेच काही मोबाईल फोनच्या आयातीवर बंदी घातली आहे. या सर्व वस्तू कमी दर्जाच्या आहेत व त्यात सुरक्षा मानकांचे पालन झालेले नाही.

व्यापार मंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सांगितले की, चीनमधून आलेले दूध व दुग्धजन्य पदार्थ यांचा दर्जा फारच वाईट आहे त्यामुळे त्यावर बंदी घातली आहे. काही मोबाईल फोनही आंतरराष्ट्रीय मोबाईल स्टेशन इक्विपमेंट आयडेंटिटी नंबर किंवा इतर सुरक्षा मानकांचे पालन करणारे नाहीत. काही पोलाद उत्पादनांवरही बंदी घालण्यात आली आहे.

कुठल्याही देशाच्या सर्वच उत्पादनांवर जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांमुळे बंदी घालता येत नाही मग त्या देशाशी तुमचे प्रादेशिक, राजनैतिक व लष्करी वाद असले तरी असे करता येत नाही.