जगातील सर्वात मोठ्या करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला कालपासून भारतात सुरुवात झाली. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी भारतात सर्वाधिक लोकांना लस देण्यात आली. यामध्ये अमेरिका, युके, फ्रान्सलाही भारतानं मागे टाकलं. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, लसीकरणाच्या पहिल्या दिवशी भारतात एकूण २,०७,२२९ कोविड योद्ध्यांना लस देण्यात आली. दिवसभरात सर्वाधिक लोकांना लस दिल्याचा हा जागतिक विक्रम ठरला आहे. अमेरिका, युके आणि फ्रान्स या आघाडीच्या देशांनाही भारतानं यामध्ये मागे टाकलं आहे.

आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मनोहर अग्नानी यांनी लसीकरणाची माहिती देताना सांगितलं की, देशात लसीकरणाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी केवळ सहा राज्यांनीच लसीकरण सेशन केले. आज झालेल्या एकूण ५५३ सेशनमध्ये १७,०७२ कोविड योद्ध्यांना लस देण्यात आली. त्यामुळे काल आणि आज अशा दोन दिवसांत एकूण २,२४,३०१ लोकांना भारतात लस देण्यात आली आहे. या दोन्ही दिवसांमध्ये लसीकरणानंतर ४४७ जणांमध्ये प्रतिकूल परिणाम दिसून आले यांपैकी केवळ तीन जणांनाच रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India defeated us uk and france for vaccines given to most people throughout the day aau
First published on: 17-01-2021 at 19:41 IST