भारतात चोवीस तासात सर्वाधिक ६९,८७८ करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या २९.७५ लाखांवर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली.

भारताचा करोनामुक्तीचा दर शुक्रवारी ७४ टक्क्यांवर पोहोचला. दिवसभरात ६२,२८२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या २१.५ लाखांवर पोहोचली आहे. तर करोनामुळं मृत्यूचा दर हा १.८९ टक्क्यांवर पोहोचला आहे.

दरम्यान, अधिकाधिक रुग्ण करोनामुक्त होऊन त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जात आहे. तसेच अनेक जणांना होम क्वारंटाइन करण्यात येत आहे. यामध्ये आजवर २१,५८,९४६ रुग्ण बरे झाले असून १४,६६,९१८ लाख रुग्ण सध्या अॅक्टिव्ह आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने शुक्रवारी म्हटले की, दोन वर्षापेक्षा कमी कालावधीत जगातून करोनाचं संकट संपलेलं असेल. सन १९१८मधील स्पॅनिश फ्लूपेक्षा हा वेग जास्त आहे.