देशात करोनाचा संसर्ग अद्यापही सुरूच आहे. एकीकडे नवीन करोनाबाधित रुग्ण आढळत असताना व करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत दररोज वाढ होत असताना, दुसरीकडे करोनामुक्त होऊन डिस्चार्ज मिळणाऱ्यांच्या संख्येतही भर पडत असल्याचे दिसत आहे. मागील २४ तासांमध्ये देशभरात २० हजार २१ नवे करोनाबाधित आढळले, तर २७९ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. याशिवाय २१ हजार १३१ जण करोनामुक्त झाल्याचे देखील समोर आले आहे. देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता १ कोटी २ लाख ७ हजार ८७१ वर पोहचली आहे.
सध्या देशातील अॅक्टिव्ह रुग्ण संख्या २ लाख ७७ हजार ३०१ असून, ९७ लाख ८२ हजार ६६९ जण करोनातून बरे झाले आहेत. याशिवाय आतापर्यंत करोनामुळे देशभरात १ लाख ४७ हजार ९०१ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.
India reports 20,021 new COVID-19 cases, 21,131 recoveries, and 279 deaths in last 24 hours, as per Union Health Ministry
Total cases: 1,02,07,871Active cases: 2,77,301
Total recoveries: 97,82,669
Death toll: 1,47,901 pic.twitter.com/4rp0O5MswG
— ANI (@ANI) December 28, 2020
देशभरात करोनाच्या पार्श्वभूमीवर २७ डिसेंबरपर्यंत देशभरात १६,८८,१८,५४ नमुन्यांची तपासणी झाली आहे. यापैकी ७ लाख १५ हजार ३९७ नमुने काल तपासण्यात आल्याची माहिती आयसीएमआरच्या हवाल्याने देण्यात आली आहे.
A total of 16,88,18,054 samples tested for #COVID19 up to December 27. Of these, 7,15,397 samples were tested yesterday: Indian Council of Medical Research (ICMR) pic.twitter.com/3QZWL9AphY
— ANI (@ANI) December 28, 2020
रम्यान, ब्रिटन, युरोप आणि आखातातून आलेल्या प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणात राहणे बंधनकारक करण्यात आले असून त्यांची करोना चाचणी प्रवासाहून आल्यानंतर सातव्या दिवशीच करण्यात येणार असल्याचे मुंबई पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यापूर्वी ही चाचणी पाचव्या किंवा सातव्या दिवशी करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. मात्र पालिका आयुक्तांनी रविवारी परिपत्रक काढून याबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत.
ब्रिटन, युरोप, आखातातून आलेल्यांच्या चाचण्या सातव्या दिवशीच!
करोना प्रतिबंध लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात सुमारे दहा लाख आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण होणार असून याची प्रात्यक्षिके(ड्राय रन) दोन जिल्ह्य़ांमध्ये जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात होण्याची शक्यता आहे.
लसीकरणाची पूर्वतयारी राज्यात सुरू असून यासाठी केंद्रीय आरोग्य विभागाने तयार केलेल्या ‘को-विन’ अॅपमध्ये आत्तापर्यंत सात लाख खासगी आणि सरकारी आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती नमूद केली आहे. यात आणखी तीन लाख आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी येत्या काही दिवसांत होण्याची शक्यता आहे. राज्यात जवळपास दहा लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना करोना प्रतिबंधात्मक लस दिली जाईल, अशी माहिती आरोग्य आयुक्तालयाचे आयमुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी दिली. पंजाब, गुजरात, आसाम आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांत लसीकरणाची प्रात्यक्षिके सोमवारी आणि मंगळवारी घेण्यात येणार आहेत.