24 November 2020

News Flash

VIDEO: एअर पॉवर बाहुबली ‘राफेल’चे अखेर भारतामध्ये लँडिंग

नभ, थल, जल शत्रू कुठेही दडलेला असो...

आकाशात नुसत्या त्याच्या ‘गर्जने’नेच शत्रूचा थरकाप उडतो. नभ, थल, जल शत्रू कुठेही दडलेला असो, त्याला शोधून अचूकतेने वार करण्यात कोणीही त्याचा हात पकडू शकत नाही. त्यामुळेच यापुढे भारतात घुसण्याचे धाडस करण्याआधी चीन-पाकिस्तान निश्चित दहा वेळा विचार करतील. भारताला हे बळ मिळालेय, ते ‘राफेल’मुळे. एकाच वेळी वेगवेगळी कामे करण्याच्या क्षमतेमुळेच ‘राफेल’ भारताचा बाहुबली आहे. येणार.. येणार.. म्हणून मागच्या दोन-तीन वर्षांपासून ज्याची चर्चा होती, ते ‘बाहुबली’ लढाऊ विमान अर्थात राफेल आज भारतात लँड झालं.

राफेलची तुकडी हिंदी महासागर क्षेत्रात दाखल होताच, नौदलाने राफेलच्या वैमानिकांना  ‘हॅप्पी लँडिंगच्या शुभेच्छा दिल्या. यूएईच्या अल धफ्रा बेसवरुन उड्डाण केल्यानंतर राफेलच्या तुकडीने पश्चिम अरबी सागरात तैनात असलेल्या भारतीय नौदलाच्या INS कोलकात्ता या युद्धनौके बरोबर संपर्क साधला.

पाच राफेल फायटर विमानांनी अंबालाच्या एअर फोर्स बेसवर लँडिंग केले. इथेच राफेलचा कायमस्वरुपी तळ असणार आहे. फ्रान्स मेरिनॅक एअर फोर्सच्या तळावरुन सोमवारी सकाळी या विमानांनी उड्डाण केले होते. संयुक्त अरब अमिरातीच्या अल धफ्रा बेसवर ही विमाने एकदिवस थांबली. त्यानंतर आज भारतात दाखल झाली. राफेलच्या पहिल्या तुकडीत तीन सिंगल सीटर आणि दोन डबल सीटर विमाने आहेत.

फ्रान्समध्ये प्रशिक्षित करण्यात आलेले भारतीय वैमानिक ही विमाने घेऊन भारतात आले. राफेल फायटर जेटच्या हाताळणीसाठी IAF चे बारा वैमानिक आणि इंजिनिअरींग क्रूला पूर्णपणे प्रशिक्षित करण्यात आले आहे. उड्डाणवस्थेत असतानाच या विमानांमध्ये इंधन भरण्यात आले. २० ऑगस्टला पारंपारिक पद्धतीने सोहळा आयोजित करुन या फायटर विमानांचा भारतीय हवाई दलात समावेश करण्यात येईल.

IAF च्या एअर क्रू आणि ग्राऊंड क्रू टीमला हे विमान कसे हाताळायचे, त्याबद्दल व्यापक असे प्रशिक्षण देण्यात आले आहे. भारताने फ्रान्सबरोबर २०१६ साली अशी ३६ राफेल विमाने खरेदी करण्याचा ५९ हजार कोटी रुपयांचा करार केला आहे. पूर्णपणे अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज विमाने फ्रान्सकडून भारताला देण्यात आली आहेत. लवकरात लवकर या विमानांचा वापर करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.

आणखी वाचा- आठ विमानांचं काम एकटं ‘राफेल’ करेल, नाक आणि छोटया चेंडूमध्ये आहे ‘सिक्रेट’

राफेलचे पहिले स्क्वाड्रन अंबाला एअर बेसवर तर दुसरे स्क्वाड्रन पश्चिम बंगाल हाशिमारा येथे असेल. भारताला मिळणारी राफेल फायटर विमाने मिटिओर आणि स्काल्प अशा मिसाइल्सनी सुसज्ज असतील. यामुळे शत्रुच्या प्रदेशात खोलवर अचूक हल्ला करण्याची भारतीय हवाई दलाची क्षमता कैकपटीने वाढणार आहे तसेच हवाई वर्चस्व सुद्धा प्रस्थापित करता येईल. सध्या चीन आणि पाकिस्तानकडे राफेलच्या तोडीचे एकही विमान नाहीय.

आणखी वाचा- फायर अँड फर्गेट: जाणून घ्या ‘राफेल’मधील घातक स्काल्प मिसाइलबद्दल

अंबाला एअरबेसजवळ १४४ कलम लागू
हरियाणामधील अंबाला हवाई तळावर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. अंबाला जिल्हा प्रशासनाने हवाई तळाजवळ १४४ कलम लागू केलं आहे. यासोबतच फोटो काढण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. फ्रान्समधून उड्डाण करण्यात आलेली राफेल लढाऊ विमानं बुधवारी भारतात दाखल होणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2020 1:53 pm

Web Title: indian air force new fighter jet rafale lands at ambala air base dmp 82
Next Stories
1 देशाच्या शैक्षणिक धोरणात ३४ वर्षांनी बदल; केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
2 सुशांत सिंह आत्महत्या; उद्धव ठाकरेंना चिराग पासवान यांचा फोन; मुख्यमंत्री म्हणाले…
3 चीनच्या स्टेल्थ J-20, पाकच्या F-16 पेक्षा राफेलच सरस, कसं ते समजून घ्या…
Just Now!
X