इंडियन एअर फोर्सच्या बेपत्ता असलेल्या एएन-३२ विमानाबद्दल अजूनही काहीही माहिती मिळू शकलेली नाही. या विमानासाठी मोठया प्रमाणावर शोध मोहिम सुरु आहे. एअर फोर्सचे सी-१३० जे विमान आणि जमिनीवर लष्कराच्या पथकाकडून शोध मोहिम सुरु आहे. अरुणाचल प्रदेशवरुन उड्डाण करत असताना या विमानाचा नियंत्रण कक्षाशी असणारा संपर्क तुटला.

विमानात आठ क्रू सदस्य आणि लष्कराचे पाच जण आहेत. १२.२५ च्या सुमारास या विमानाने आसामच्या जोरहट तळावरुन उड्डाण केले होते. एक वाजण्याच्या सुमारास एएन-३२ चा नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला. दुपारी दीड वाजेपर्यंत हे विमान अरुणाचल प्रदेशच्या मीचुका अॅडव्हान्स लँडिंग ग्राऊंड येथे पोहोचणे अपेक्षित होते. दोन एमआय १७ हेलिकॉप्टर आणि अन्य विमाने शोध मोहिमेसाठी तैनात करण्यात आली आहेत.

जमिनीवर लष्कर आणि आयटीबीपीकडून शोध सुरु आहे. आसामच्या जोरहट तळावरुन एएन-३२ ने उड्डाण केले होते. यापूर्वी २०१६ मध्ये बंगालच्या खाडीमध्ये एएन-३२ दुर्घटनाग्रस्त झाले होते. त्यावेळी या विमानात २९ जण होते.