01 December 2020

News Flash

घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला; तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

पूंछ जिल्ह्य़ातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न लष्कराने शनिवारी हाणून पाडला आणि त्या वेळी केलेल्या कारवाईत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.दहशतवाद्यांच्या एका गटाने भारतीय

| July 17, 2016 02:03 am

पूंछ जिल्ह्य़ातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न लष्कराने शनिवारी हाणून पाडला आणि त्या वेळी केलेल्या कारवाईत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.दहशतवाद्यांच्या एका गटाने भारतीय हद्दीत  घुसण्याचा प्रयत्न केला तेव्हा लष्कराने त्यांना पूंछ जिल्ह्य़ातील साजियान परिसरातच अडकवून ठेवले. त्यानंतर करण्यात आलेल्या गोळीबारात तीन दहशतवादी ठार झाले, असे संरक्षण दलाचे प्रवक्ते कर्नल एस. डी. गोस्वामी यांनी सांगितले.

 

———————————————————————————————————————————

 

दहशतवाद्यांच्या गोळीबारात काश्मीरमध्ये दोन जखमी

पुलवामा जिल्ह्य़ात शुक्रवारी रात्री दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये एका माजी पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश असून तो शरणागती पत्करलेला दहशतवादी आहे, असे पोलिसांनी सांगितले.

पुलवामा जिल्ह्य़ातील करीमाबाद येथे शुक्रवारी रात्री दहशतवाद्यांनी शरणागती पत्करलेला दहशतवादी तारिक अहमद पंडित याचा पुतण्या शाबीर पंडित आणि मंजूर अहमद यांच्यावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात जखमी झालेल्या दोघांना श्रीनगरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुरहान वानी याच्या हिजबूल मुजाहिद्दीन संघटनेत सामील होण्यासाठी तारिकने गेल्या वर्षी पोलीस दलास रामराम ठोकला होता.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2016 2:03 am

Web Title: indian army kill teririst in jammu
Next Stories
1 मध्य भारतातील पावसाच्या अचूक अंदाजासाठी गणिती प्रारूप
2 जीएसटीने १४ हजार कोटींचा फटका
3 मुख्यमंत्री बदलून काँग्रेसने अरुणाचल प्रदेश राखले
Just Now!
X