12 July 2020

News Flash

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, २ ठार

पाकिस्तानने शनिवारी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून, जम्मू काश्मीरच्या आर. एस पूरा आणि अरनिया भागात पाकिस्तानी लष्कराकडून बेछूट गोळीबार कऱण्यात आला .

| August 23, 2014 09:17 am

पाकिस्तानने शनिवारी पुन्हा एकदा  शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून, जम्मू काश्मीरच्या आर. एस पूरा आणि अरनिया भागात पाकिस्तानी लष्कराकडून बेछूट गोळीबार कऱण्यात आला . आज पहाटे केलेल्या जोरदार गोळीबारात सीमेवरील गावातील दोन नागरिकांचा मृत्यू झाला. तर, पाच नागरिक जखमी असून, एक सीमा सुरक्षा दलाचा जवानही जखमी झाला आहे.
पहाटे १ वाजल्यापासून सुरु असलेल्या या गोळीबारात पाकिस्तानने सीमेवरील २२ चौक्यांना लक्ष्य केले. या हल्ल्यात सीमावर्ती भागात राहणाऱ्या दोन नागरिकांचा मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले आहेत. मुहम्मद अक्रम आणि त्यांचा १३ वर्षीय मुलगा अस्लम या दोघांचा गोळीबारात मृत्यू झाला तर अक्रम यांची पत्नी व तीन मुले जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जम्मू वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.  पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या जोरदार गोळीबारामुळे सीमेवरील सुमारे दोन हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 23, 2014 9:17 am

Web Title: indian army uncover cross border tunnel pakistani rangers kill two civilians injure five
टॅग Pakistan
Next Stories
1 पाकिस्तानच्या हल्ल्यास भारतीय लष्कराचे चोख प्रत्युत्तर- अरूण जेटली
2 ‘आयएनएस कमोर्टा’ भारतीय नौदलात दाखल
3 ‘कौन बनेगा करोडपती’मधून प्रेक्षकांची दिशाभूल
Just Now!
X