फुटीरतावादी नेता यासिन मलिक, सय्यद अली शाह गिलानी आणि मीरवाइज उमर फारूक यांची पोलिसांनी सुटका केली आहे.

फुटीरतावादी नेता यासिन मलिक याला पोलिसांनी आज सकाळी अटक केली होती. तसेच, फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी, मीरवाइज उमर फारूक यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. श्रीनगर येथील हैदरपोरा येथे होणा-या संयुक्त परिसंवादात यासिनला उपस्थित राहण्यापासून प्रतिबंध घालण्यासाठी त्याला अटक करण्यात आली होती . हुरियत परिषद आणि जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटने या परिसंवादाचे आयोजन केले होते. या परिसंवादामार्फत भारत सरकारच्या काश्मीर विरोधी धोरणांसंदर्भात जागृती करण्यात येणार होती.

(संग्रहित छायाचित्र)