03 August 2020

News Flash

छत्तीसगडमध्ये स्फोटात जवान शहीद

कोंटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मुरलीगुडानजीकच्या जंगलात ही घटना घडली.

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्य़ात शुक्रवारी आयईडीच्या स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) एक जवान शहीद, तर चार जण जखमी झाले. जखमींमध्ये दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
कोंटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मुरलीगुडानजीकच्या जंगलात ही घटना घडली. मुरलीगुडा आणि बांदा या गावांदरम्यान रस्ता बांधण्याचे काम सुरू असून, तेथे सुरक्षा पुरवण्यासाठी सीआरपीएफचे गस्ती पथक या ठिकाणी आले असताना नक्षलवाद्यांनी हा स्फोट घडवून आणल्याचे सुकमा जिल्ह्य़ाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक संतोष सिंह यांनी सांगितले.
या स्फोटात धातूचे तुकडे अंगात शिरून जखमी झालेले हेड कॉन्स्टेबल रंगा राघवन हे रुग्णालयात मरण पावले, तर उपसमादेशक श्याम निवास हे गंभीर असून इतर तिघांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2016 12:14 am

Web Title: indian soldier death in chhattisgarh bomb blast
Next Stories
1 महिला वैमानिकांना चार वर्षे मातृत्व नको
2 आक्षेपार्ह आशयामुळे दूरचित्रवाणी वाहिन्यांवर तीन ते पाच दिवस बंदी
3 देशभरातील रेशन दुकानांचे तीन वर्षांत संगणकीकरण
Just Now!
X