News Flash

भारतात घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना जवानांनी केलं ठार

पंजाबमध्ये भारत-पाकिस्तान सीमारेषेवर कारवाई

संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र

भारतार घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी ठार केलं आहे. पंजाबमध्ये भारत-पाकिस्तान सीमारेषेवर ही कारवाई करण्यात आली. घुसखोर सीमारेषा पार करुन भारतात शिरण्याचा प्रयत्न करत असतानाच बीएसएफच्या जवानांनी त्यांना पाहिलं. यावेळी करण्यात आलेल्या कारवाईत घुसखोर ठार झाले. बीएसएफकडून ट्विट करत ही माहिती देण्यात आली आहे.

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जवानांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता घुसखोरांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. यानंतर जवानांकडूनही प्रत्युत्तर देत गोळीबार करण्यात आला. यावेळी झालेल्या गोळीबारात पाच घुसखोर ठार झाले.

अजून कोणी घुसखोर लपले नाही ना याचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2020 12:13 pm

Web Title: infiltrators shot dead bsf along the border with pakistan in punjab sgy 87
Next Stories
1 पंतप्रधानांसाठी तयार केलेलं हजारो कोटींचं ‘विशेष विमान’ पुढील आठवड्यात भारतात
2 वंदे भारत…४४ ट्रेनचं कंत्राट रद्द करत भारताचा चीनला झटका
3 विक्रमी वाढ! देशात २४ तासांत ६९ हजार करोनाबाधित; एकूण रुग्णसंख्या ३० लाखांच्या उंबरठ्यावर
Just Now!
X