News Flash

जातीय तणावामुळे जयपूरमध्ये इंटरनेटवर र्निबध

शहरातील काही भागांमध्ये इंटरनेटवर घातलेल्या र्निबधांना २४ तासांसाठी मुदतवाढ देण्यात आली.

हमझा खान, एक्स्प्रेस वृत्तसेवा, जयपूर

जयपूरमध्ये सात वर्षांच्या मुलीवर बलात्काराच्या घटनेनंतर जातीय तणाव निर्माण झाल्याने राज्य सरकारने गुरुवारी शहरातील काही भागांमध्ये इंटरनेटवर घातलेल्या र्निबधांना २४ तासांसाठी मुदतवाढ देण्यात आली. या बलात्कारप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. मात्र, चौकशी सुरू असल्याने यापैकी कोणालाही अटक केलेली नाही, असे जयपूरचे पोलीस आयुक्त आनंद श्रीवास्तव यांनी सांगितले. या चिमुरडीला सोमवारी अनोळखी व्यक्तीने दुचाकीवरून तिच्या घराजवळूनच पळविले. दोन तासांनी या मुलीला तेथेच सोडण्यापूर्वी त्या नराधमाने तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर जातीय तणाव वाढला आणि जमावाने आरोपीच्या अटकेची मागणी करीत अनेक घरांना लक्ष्य केले. यात ६० हून अधिक वाहनांची मोडतोड झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2019 1:01 am

Web Title: internet closed in jaipur due to communal tension zws 70
Next Stories
1 दाऊद पाकिस्तानमध्ये नसल्याचा दावा
2 आयएनएक्स मीडिया प्रकरणात माफीची साक्षीदार होण्याची इंद्राणी मुखर्जीला परवानगी
3 काँग्रेसतर्फे ट्विटरवर रा. स्व. संघविरोधी व्हिडीओ
Just Now!
X