अॅपलने आपल्या बहुप्रतीक्षित आयफोनची नवी आवृत्ती आयफोन x, आयफोन ८ व आयफोन ८ प्लसची घोषणा केली. त्याचबरोबर अॅपल वॉच सीरिज ३ आणि अॅपल ४ के टीव्हीही लाँच केला. कॅलिफोर्नियातील क्यूपर्टिनो येथील अॅपलच्या नव्या कॅम्पसमध्ये रंगलेल्या या सोहळ्यास जगभरातील पत्रकार, तंत्रज्ञानप्रेमी उपस्थित होते. स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अपेक्षेप्रमाणे अॅपलचे सीईओ टीम कूक यांनी कार्यक्रमाची सुरूवात केली. त्यांनी अॅपलचे सहसंस्थापक दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांचा संदेश सांगत सोहळ्याची सुरूवात केली. अॅपलसाठी आजचा सोहळा विशेष होता कारण १० वर्षांपूर्वी स्टीव्ह जॉब्स यांनीच पहिला आयफोन लाँच केला होता.

Apple iPhone X: होम बटन गायब, फेस आयडीने फोन अनलॉक करता येणार

प्रारंभी टीम कूक यांनी अॅपल वॉच सीरिज ३ ची घोषणा केली. या वेळी एक माहितीपट दाखवण्यात आला. जगात सर्वाधिक विकला जाणारा स्मार्टवॉच म्हणून अॅपलची ओळख असल्याचे त्यांनी सांगितले. अॅपल स्मार्टवॉचच्या किंमतीत दरवर्षी ५० टक्क्यांनी वाढ होत असल्याची सांगत अॅपलसाठी ही अभिमानास्पद बाब असल्याचे ते म्हणाले. या वेळी अॅपलचा ४ के टीव्ही लाँच करण्यात आला. या टीव्हीमध्ये आतापर्यंतची सर्वांत उत्तम पिक्चर क्वॉलिटी असल्याचा दावा करण्यात आला. सध्यातरी हे दोन्ही प्रॉडक्ट भारतात उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे भारतीय ग्राहकांना याची आणखी वाट पाहावी लागणार आहे.

Apple iPhone 8, iphone 8 plus: वायरलेस चार्जिंग अन् पॉवरफुल स्मार्टचिप, जाणून घ्या फिचर्स

सर्वांत शेवटी संपूर्ण जगाला प्रतिक्षा असलेल्या आयफोन ८, ८ प्लस आणि आयफोन x ची घोषणा करण्यात आली. ही तिन्ही फोनमध्ये वायरलेस चार्जिंगची जबरदस्त सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नव्या आयफोनची स्मार्ट चीप सर्वाधिक पॉवरफुल असल्याचे सांगण्यात आले. तर आयफोन x मध्ये १२ मेगापिक्सचे २ रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. त्याचबरोबर टॉपला इन्फ्रारेड कॅमेरा आहे. जो अंधारातही युजरचा चेहरा डिटेक्ट करू शकतो. फेस आयडीने फोन अनलॉक करता येणार आहे.

Apple Tv 4K: लाइव्ह स्पोर्ट्स, ग्राफिक्सचा चौपट वेग, किंमतही कमी

 

भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री १०.३० वाजता या सोहळ्यास सुरूवात झाली. सुमारे दोन तास हा सोहळा रंगला होता.

Apple Watch Series 3: चार कोटी गाणी, इलेक्ट्रॉनिक सिम आणि बरंच काही..

UPDATES:

– अॅपल आयफोन x ची किंमत ९९९ डॉलरपासून सुरू होईल. ३ नोव्हेंबरपासून हा फोन उपलब्ध होईल. किंमत व रेंज पुढीलप्रमाणे असेल.

– आयफोन x ची बॅटरी लाईफ ही आयफोन ७ पेक्षा दोन तास जास्त आहे. त्याचबरोबर वायरलेस चार्जिंग सुविधा देखील उपलब्ध असेल. त्याचबरोबर एअर पॉवरही आहे.

– आयफोन x मध्ये होम बटन नाही. त्याचबरोबर टॉपला इन्फ्रारेड कॅमेरा आहे. जो अंधारातही युजरचा चेहरा डिटेक्ट करू शकतो.

– आयफोन x (१०) मध्ये १२ मेगापिक्सल चे दोन रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. त्याचबरोबर यामध्ये सॅमसंग नोट ८ सारखी क्वाड एलईडी लाईटही देण्यात आली आहे.

– आयफोन x  (१०) ची अॅपलकडून घोषणा

– यामध्ये ३D टच आणि ट्रू टोन डिस्प्ले आहे.

–   दि. १९ सप्टेंबरपासून आयफोन-८ बाजारात उपलब्ध होईल

– नव्या आयफोनची स्मार्ट चीप सर्वाधिक पॉवरफुल

– अॅपल आयफोन ८ आणि आयफोन ८ प्लस हा ६४ जीबी, २५६ जीबीमध्ये उपलब्ध होईल. आयफोन ८ ची किंमत ६९९ डॉलरपासून  तर (४४७६०)आयफोन ८ प्लस ७९९ डॉलरपासून (५११६३ रुपये) सुरू होईल

– सिल्वर, स्पेस ग्रे आणि गोल्ड या तीन रंगात मोबाइल मिळणार

– आयफोन-८ चा डिस्प्ले ४.७ इंच तर आयफोन-८ प्लसचा डिस्प्ले ५.५ इंच असेल

– या फोनमध्ये वायरलेस चार्जिंग ही अत्यंत आधुनिक सुविधा उपलब्ध

–   बहुप्रतीक्षित आयफोन ८, आयफोन ८ प्लसची टीम कूक यांनी केली घोषणा

– भारतात मिळणार नाही अॅपल ४ के टीव्ही

– ३२ जीबी टीव्हीची ११,४६२ रूपये आणि ६४ जीबीची १२,७४२ रूपये किंमत

– एचडीआर १०, डॉल्बी व्हिजनला सर्पोट करणार

– अॅपल ४ के टीव्हीची घोषणा, आतापर्यंतची सर्वांत उत्तम पिक्चर क्वॉलिटी असल्याचा दावा

– अॅपल वॉच सीरिज ३ सध्या तरी भारतात उपलब्ध येणार नाही. सेल्यूलर आणि नॉन सेल्यूलर दोन्ही पर्यायात उपलब्ध होणार.

– कॉलही करता येणार

– अॅपल वॉच सीरिज ३ हृदयाचे ठोके ही मोजणार

– दि. १५ सप्टेंबरपासून ऑर्डर देता येईल आणि २२ सप्टेंबरपासून ते बाजारात उपलब्ध होतील.

– अॅपल वॉच ३ मध्ये ४० मिलियन गाणी

– अॅपल वॉच ३ मध्ये वायफायची सुविधा

– अॅपल वॉचच्या विक्रीत प्रत्येक वर्षी ५० टक्क्यांनी वाढ- टीम कूक

–  अॅपल वॉचने लोकांचे जीवन सुकर बनवले आहे- टीम कूक

– अॅपल वॉच ३ लाँच, टीम कूक यांची घोषणा. ९७ टक्के ग्राहक समाधानी

– अॅपलच्या यशामागे स्टीव्ह जॉब्सचा होत मोठा असल्याचे टीम कूक यांनी सांगितले.

– अॅपलचे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्स यांचा संदेश सांगत सीईओ टीम कूक यांनी सोहळ्याची सुरूवात केली.

– अॅपलच्या वेबसाईटवर या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहता येईल.

– अॅपल पार्कची सैर (व्हिडिओ)

– अॅपलचा सोहळा सुरू होण्यास अवघा अर्धा तास. सर्व तयारी पूर्ण.

– तंत्रज्ञानाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा सोहळा आहे.

– एक हजार व्यक्ती बसतील इतकी स्टीव्ह जॉब्स थिएटरची क्षमता

–  स्टीव्ह जॉब्स थिएटर आतून असं दिसतं.

– स्टीव्ह जाॅब्स थिएटरचा बाहेरील भाग

– अॅपलच्या कॅलिफोर्नियातील कुपेरटिनो येथील मुख्यालयात हा सोहळा रंगणार आहे. या इमारतीचा आकार एका भल्या मोठ्या स्पेसशीपसारखा आहे. अॅपलचे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या स्मरणार्थ येथील अॅपल पार्क उभारण्यात आले आहे. या पार्कमध्ये ९००० ओकचे वृक्ष आहेत.