News Flash

लग्न न केल्याच्या कारणावरून इराणी फिल्म निर्मात्याची आई वडिलांकडून हत्या

शरीराचे तुकडे करून भरले बॅगेत

प्रतिकात्मकछायाचित्र

इराणमध्ये ऑनर किलिंगचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इराणी चित्रपट दिग्दर्शक बबाक खोर्रामदीन याची त्याच्या आई वडिलांनी निर्घृण हत्या केली आहे. लग्न न केल्याच्या कारणामुळे त्याची निर्दयीपणे हत्या करून त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करून बॅगेत भरले होते. या प्रकरणी त्याच्या आई वडिलांना अटक करण्यात आली आहे.

४७ वर्षीय बबाब खोर्रामदीन याने २००९ साली तेहरान विद्यापीठातून चित्रपट निर्मिती पदवी घेतली होती. त्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी बबाक लंडनमध्ये गेला होता. त्यानंतर इराणमध्ये परतल्यानंतर तो विद्यार्थ्यांना चित्रपट निर्मितीचे धडे देण्याचं काम करू लागला. या दरम्यान त्याने अनेक शॉर्ट फिल्म्स तयार केल्या. कुटुंबियांपासून लांब जात त्याने चित्रपट क्षेत्रावरच लक्ष केंद्रीत केलं. मात्र या दरम्यान त्याचे वडील आणि त्याच्यात लग्नाबाबत वाद होत होते. घटनेच्या दिवशी बबाक आणि वडिलांचं कडक्याचं भांडण झालं. तेव्हा रागाच्या भरात वडिलांनी त्याला भूल दिली आणि त्याची हत्या केली. एवढंच नाही तर गुन्हा लपवण्यासाठी त्याच्या शरीराचे तुकडे करून बॅगेत भरले. मात्र पोलिसांना या खुनाचा सुगावा लागला आणि त्यांनी आई वडिलांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर त्यांनी हत्या केल्याची कबुली दिली.

स्पुटनिक लसीचे दोन डोस व २४ दिवसांची रशियावारी फक्त सव्वा लाखात

या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. इराणमध्ये ऑनर किलिंगचे हा पहिला प्रकार नसल्याचं इराण आंतरराष्ट्रीय टीव्हीचे विश्लेषक आणि संपादक जेसन ब्रॉडस्की यांनी सांगितले आहे. करोना काळात कौटुंबिक हिंसाचार आणि हत्यांमध्ये वाढ झाल्याचही त्यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 7:02 pm

Web Title: iranian film director murdered by his parents for unmarried status rmt 84
टॅग : Crime News
Next Stories
1 Cyclone Tauktae: तटरक्षक दलाने पाच दिवस आधीच ओएनजीसीला दिली होती जहाजं परत बोलवण्याची सूचना
2 केंद्र सरकारने लसीकरणाविषयीच्या नियमावलीमध्ये केले महत्त्वपूर्ण बदल
3 Cyclone Tauktae : गुजरातसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची १ हजार कोटींच्या मदतनिधीची घोषणा!
Just Now!
X