26 January 2021

News Flash

एअर इंडियाच्या विमानात धिंगाणा घालणाऱ्या महिलेचा इंग्लंडमध्ये मृत्यू

दारु पिऊन एअर इंडियाच्या विमानामध्ये धिंगाणा घालणारी आयरिश महिला इंग्लंडमध्ये मृतावस्थेत सापडली आहे.

दारु पिऊन एअर इंडियाच्या विमानामध्ये धिंगाणा घालणारी आयरिश महिला इंग्लंडमध्ये मृतावस्थेत सापडली आहे. सिमोन बर्न्स (५०) असे या महिलेचे नाव असून मागच्या वर्षी तिने एअर इंडियाच्या विमानात गोंधळ घातला होता. सिमोन बर्न्सने केबिन क्रू ला शिवीगाळ करताना त्यांच्या अंगावर थुंकली सुद्धा होती. नुकतीच तिची तुरुंगातून सुटका झाली होती.

एअर इंडियाच्या विमानातील वर्तणुकीबद्दल तिला सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. सिमोन बर्न्स पेशाने मानवी हक्कांसाठी लढणारी वकील होती. विमानातील क्रू ने तिला दारु द्यायला नकार दिल्यानंतर तिचा पारा चढला. तिने क्रू मेंबर्सना शिवीगाळ केली होती. विमानातील क्रू ने तिला आधीच वाईनच्या तीन बाटल्या दिल्या होत्या.

एअर इंडियाच्या मुंबई-लंडन विमानात ही घटना घडली होती. सिमोन बर्न्स बिझनेस क्लासमधून प्रवास करत होती. दारु नाकारल्यानंतर केब्रिन क्रू ला शिवीगाळ करताना तिने भारतीयांबद्दलही अनेक अपशब्द उच्चारले होते. विमानातील पुरुष क्रू सदस्यावर ती थुंकली सुद्धा होती. तिचे हे सर्व वर्तन कॅमेऱ्यामध्ये कैद झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2019 3:00 pm

Web Title: irish woman abused spat at air india crew found dead in england dmp 82
Next Stories
1 ‘आयुष्य एकदाच मिळते, आयटी क्षेत्रात काम करताना हे विसरु नकोस’; चिठ्ठी लिहून त्याने केली आत्महत्या
2 डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्या नागरिकांना आरोग्य सुविधा देऊ नयेत : हेमा मालिनी
3 ‘मी मुस्लीमच आहे’, फतव्यावर नुसरत जहाँचे सडेतोड उत्तर
Just Now!
X