बालकोट एअर स्ट्राइकबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच एक धक्कादायक विधान केले होते. त्या विधानावरुन मोदी यांना मोठया प्रमाणात ट्रोलही करण्यात आले. एअर स्ट्राइकच्यादिवशी बालाकोटमध्ये वातावरण खराब झाल्यामुळे हल्ला करावा की, करु नये याबद्दल संभ्रम होता. तज्ञमंडळी तारीख बदलण्याच्या विचारामध्ये होती. पण खराब ढगाळ हवामानाचा आपल्याला फायदा होऊ शकतो असे मोदी यांचे मत होते.

काय म्हणाले होते मोदी
बालकोटमध्ये वातावरण अचानक बदलल. हवामान ढगाळ झाले आणि पाऊस कोसळत होता. बालाकोट एअर स्ट्राइकच्या तयारीचा आढावा घेताना हल्ला करावा की, करु नये असा प्रश्न काहींच्या मनात निर्माण झाला होता. माझ्या मनात दोन विषय होते. गोपनीयता महत्वाची होती. मला विज्ञानातले सर्व काही कळत नाही. मोठया प्रमाणात ढग आणि पाऊस असल्यामुळे फायदा होऊ शकतो असे माझे मत होते. ढगांमुळे पाकिस्तानी रडारला आपण चकवा देऊ शकतो असे माझे मत होते. सगळेचजण संभ्रमात होते. अखेर मी ऑपरेशनला परवानगी दिली.