News Flash

इस्त्रो कॅम्पसमधील इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या २० गाडया घटनास्थळी

भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोच्या अहमदाबाद येथील स्पेस अॅप्लिकेशन सेंटरमध्ये भीषण आग भडकली आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा पथकाचा एक जवान या आगीमध्ये जखमी झाला आहे.

भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोच्या अहमदाबाद येथील स्पेस अॅप्लिकेशन सेंटरमध्ये भीषण आग भडकली आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा पथकाचा एक जवान या आगीमध्ये जखमी झाला आहे. अग्निशमन दलाच्या २० पेक्षा जास्त गाडया घटनास्थळी दाखल झाल्या असून आग नियंत्रणात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत असे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

घटनास्थळी जवळपास १० रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या आहेत. इस्त्रोच्या आवारातील ३७ नंबर इमारतीमध्ये ही आग भडकली आहे. या इमारतीत मोठया प्रमाणावर यंत्र सामुग्री आहे. शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक शक्यता आहे. अहमदाबादचे जिल्हाधिकारी सुद्धा घटनास्थळी पोहोचले असून नेमके किती जण जखमी झालेत ते स्पष्ट झालेले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 4:30 pm

Web Title: isro building fire
टॅग : Fire,Isro
Next Stories
1 अब्रूनुकसानी खटला : जेटलींविरोधात केलेलं ते वक्तव्य केजरीवालांनी दिलेल्या माहितीच्या आधारे – कुमार विश्वास
2 आधार कार्डामुळे खासगी माहितीला कोणताही धोका नाही – बिल गेट्स
3 रेल्वेच्या ऑनलाइन तिकिटाचेही बोर्डिंग स्टेशन बदलता येणार
Just Now!
X