अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी आपल्या कुटुंबासह भारताचा २६तासांचा दौरा केला. या दौऱ्यामध्ये इव्हान्का ट्रम्प यांची सर्वाधिक चर्चेत राहिल्या. अगदी त्यांच्या कपड्यांपासून ते त्यांच्या हेअर स्टाइलपर्यंत प्रत्येक गोष्टीची चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. या दौऱ्यामध्ये इव्हान्का यांनी आग्र्यातील ताजमहलला भेट दिली. यावेळी त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. अनेकांनी या फोटोला पसंती दिली. तर काहींच्या मते हा फोटो फोटोशॉपच्या माध्यमातून एडिट केल्याचं म्हटलं जात आहे.
ताजमहल पाहण्यासाठी गेलेल्या इव्हान्का ट्रम्प यांनी ताजमहल बाहेरील आवारामध्ये एक फोटो काढला होता. या फोटोमध्ये त्यांच्या आजूबाजूचा भाग ब्लर दिसतोय. मात्र त्यांच्या उजव्या हाताजवळचा छोटा भाग स्पष्ट दिसतोय. यावरून त्यांनी हा फोटो फोटोशॉप केल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.
दरम्यान, इव्हान्का यांनी भारतभेटीच्या दिवसातले अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. इव्हान्का यांचे इन्स्टाग्रामवर ६ मिलिअन फॉलोअर्स आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 29, 2020 3:37 pm