जम्मू : जम्मू काश्मीर प्रशासनाने दक्षिण काश्मीरमधील फळ उत्पादकांकडून  १.३४ लाख पेटय़ा  सफरचंदांची खरेदी केली आहे, बाजार हस्तक्षेप योजनेत ही खरेदी करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले.

अनंतनाग जिल्ह्य़ातील बाटेंगू फळ बाजारातून १,३४,००० सफरचंद पेटय़ा खरेदी करण्यात आल्या असून फळ उत्पादकांना २.५० कोटी रुपये देण्यात आले आहेत.

फलोद्यान विभागाने जास्त लागवड असलेल्या भागात २० कूपनलिका, १९ पाटबंधारे पंप वाटप केले आहेत. ६६,३३५ हेक्टर जमीन लागवडीखाली असून  ३८,७५६.७५ हेक्टर खरीप व २६,२७९हेक्टर रब्बी लागवड आहे.

राज्यपालांचे सल्लागार फारूक खान यांच्या नेतृत्वाखालील बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. २४,०३६.९७ हेक्टर क्षेत्रात भात, १०,६७६ हेक्टरमध्ये मका, १,६७८ हेक्टरमध्ये डाळी, १,४५४ हेक्टरमध्ये तेलबियांची लागवड केली जाणार आहे.

१,४६७ क्विंटल भात बियाणे, २०.९४ क्विंटल भाज्याचे बियाणे, ४० क्विंटल मका बियाणे, ४.२२ क्विंटल डाळी बियाणे, ५०१ क्विंटल चाऱ्याचे बियाणे वाटप करण्यात आले. पंतप्रधान किसान योजनेत ८५,२६५ लाभार्थी असून ६१,९१२ उत्पादकांना मदत देण्यात आली आहे.