20 September 2020

News Flash

भारताच्या ‘या’ राज्यात घरात शौचालय नसल्याने रोखले पगार

घरात शौचालय नसलेल्या राज्य सरकारी कर्मचा-यांविरोधात कठोर पावलं, सरकारने रोखले पगार

जम्मू-काश्मिरला हागणदारीमुक्त बनवण्यासाठी सरकारने कडक पावलं उचलली आहेत. घरात शौचालय नसलेल्या राज्य सरकारी कर्मचा-यांविरोधात कठोर पावलं उचलताना जम्मू-काश्मिर सरकारने त्यांचे पगार रोखले आहेत. येथील किश्तवार जिल्ह्यात 616 सरकारी कर्मचा-यांचा पगार घरात शौचालय नसल्याने रोखण्यात आला आहे. एका अधिका-याने शनिवारी याबाबत माहिती दिली.

किश्तवारचे जिल्हा विकास आयुक्त अंग्रेज सिंह राणा यांनी शुक्रवारी सहाय्यक आयुक्त अनिल कुमार चंदेल यांच्या एका अहवालाच्या आधारे हा आदेश काढला . या अहवालात किश्तवारच्या पद्देर ब्लॉकमध्ये राज्य सरकारच्या 616 कर्मचा-यांच्या घरी शौचालय नसल्याचं नमूद केलं होतं. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जम्मू-काश्मिरमध्ये 71.95 टक्के घरांमध्ये शौचालयाचं लक्ष्य पूर्ण झालं आहे. तर किश्तवारमध्ये केवळ 57.23 शौचालय बांधण्याचं लक्ष्य पूर्ण झालं आहे, असं अहवालात म्हटलं होतं. त्यानंतर त्या 616 कर्मचा-यांचा पगार रोखण्यात आला.

चंदेल यांचा अहवाल किश्तवरचे जिल्हा विकास आयुक्त राणा यांनी गंभीरतेने घेतला आहे. ‘हे लाजिरवाणं दृश्य असून सरकारची वाईट प्रतिमा यातून दिसते. राज्य सरकारी कर्मचारी असल्याने आमची वागणूक, आमचा व्यवहार इतरांसाठी उदाहरण ठरेल अशाप्रकारे असायला हवा’ असं राणा म्हणाले.

कुठे किती लक्ष्य पूर्ण –
पुलवामा – 98.64 टक्के लक्ष्य
अनंतनाग – 98.43 टक्के
कुपवाडा – 91.92 टक्के
राजोरी – 84.53 टक्के
कुलगाम – 72.95 टक्के

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2018 11:48 am

Web Title: jammu and kashmir government has blocked the salaries of employees for failing to construct toilets at home
Next Stories
1 बारा वर्षांपर्यंतच्या मुलींवर बलात्कार करणाऱ्याला फाशी: वटहुकूमास राष्ट्रपतींची मंजुरी
2 Video : वाघा बॉर्डरवर पाकिस्तानी बॉलरचं चिथावणीखोर कृत्य, बीएसएफचा संताप
3 इतक्या मोठ्या देशात बलात्काराच्या एक-दोन घटना होणारच: केंद्रीय मंत्री
Just Now!
X