जम्मू- काश्मीरमधील सोपोर येथे दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) पथकावर ग्रेनेड हल्ला केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. या हल्ल्यात तीन जवान जखमी झाले आहेत. दुसरीकडे सोपोरमधील वारपोरा येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली.

सोपोरमधील मुख्य चौकात स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेजवळ गुरुवारी सकाळी सीआरपीएफच्या पथकावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात तीन जवान जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर परिसरातील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दुसरीकडे सोपोरमधील वारपोरा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. चकमक सुरु असलेल्या परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. या भागात स्थानिकांनी सुरक्षा दलाच्या कारवाईत अडथळे आणल्याचे वृत्त आहे.

बांदीपोरा येथील हाजिन येथे देखील सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. वारपोरा आणि हाजिन येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती.