News Flash

JNU Violence : हल्ला करणाऱ्या ‘त्या’ मुलीची ओळख पटली; पोलिसांनी पाठवली नोटीस

व्हिडीओमध्ये ही मुलगी दिसत आहे.

JNU violence : Delhi Police identifies Masked Woman :

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात घुसून हल्ला करणाऱ्या टोळक्यातील तोंड बांधलेल्या मुलीची ओळख पटवण्यात दिल्ली पोलिसांना यश आलं आहे. दिल्ली पोलिसांचे विशेष पथक या घटनेचा तपास करत असून, दोन साथीदारांसह साबरमती वसतिगृहात असलेल्या मुलीची ओळख पटली असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. पाच जानेवारी रोजी करण्यात आलेल्या या हल्ल्यात जेएनयू विद्यार्थी संघाची अध्यक्षा आयेषी घोषसह ३४ जण जखमी झाले होते.

जेएनयू प्रशासनानं घेतलेल्या शुल्क वाढीविरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. पाच जानेवारी रोजी आंदोलन सुरू असतानाच तोंड बांधून आलेल्या टोळक्यानं अचानक पेरियार आणि साबरमती वसतिगृहात घुसून धुडगुस घातला. लोखंडी सळया आणि काठ्यांनी केलेल्या हल्ल्यात ३४ जण जखमी झाले होते. या घटनेचा तपास सुरू असून, यासाठी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

दरम्यान, पेरियार वसतिगृहात आणि सर्व्हर रूममध्ये तोडफोड करणाऱ्या संशयितांची नावे पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर केली. त्यानंतर साबरमती आणि पेरियार वसतिगृहात घुसून हल्ला करणाऱ्या टोळक्यातील एका मुलीची ओळख पटली आहे. एका व्हिडीओमध्ये साबरमती वसतिगृहात एक मुलगी हातात काठ्या असलेल्या दोन सहकाऱ्यांसह धमक्या देत आहे. चौकडी शर्ट घातलेल्या या मुलीने स्वतःचा चेहरा निळ्या रंगाच्या स्कार्फने बांधलेला होता. ही मुलगी दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे. तिचे नाव कळू शकले नाही. मात्र, ती अभाविपची (अखिल भारतीय विद्यार्थी परिषद) सदस्य असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, मुलीशी संपर्क करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. पण, ती घरी नव्हती. तिचा फोन बंद असून, पोलिसांनी तिला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्याचबरोबर चौकशीसाठी हजर होण्यास सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2020 8:54 am

Web Title: jnu violence police identify masked woman in video bmh 90
Next Stories
1 इराकमधील अमेरिकी सैन्य तळावर पुन्हा क्षेपणास्त्र हल्ला
2 देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना तुरुंगात पाठवू!
3 पाकिस्तानमधील छळाची जगाला जाणीव
Just Now!
X