06 July 2020

News Flash

केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल फेसबुकवर करणार विरोधकांचा सामना

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशातील वातावरण तापले असतानाच केंद्रीय दुरसंचार मंत्री कबिल सिब्बल आता फेसबुकच्या माध्यमातून सोशल साईटसवरील युद्धात उतरले आहेत.

| March 12, 2014 02:23 am

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशातील वातावरण तापले असतानाच केंद्रीय दुरसंचार मंत्री कबिल सिब्बल आता फेसबुकच्या माध्यमातून सोशल साईटसवरील युद्धात उतरले आहेत. विरोधकांकडून जाणीवपूर्वक पसरविल्या जाणा-या खोट्या माहितीचा आणि अफवांचा प्रतिवाद करण्यासाठी सिब्बल यांनी आपले फेसबुक अकाऊंट उघडल्याचे समजते. निवडणुकांच्या दृष्टीने आपण प्रचार करत असलेल्या उमेदवारांबद्दल खरी आणि योग्य माहिती मतदारांपर्यंत पोहचण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. काँग्रेसकडून यापूर्वीसुद्धा सभागृहात आणि सभागृहाबाहेर विरोधकांचा सामना करण्यासाठी मंत्र्यांची नेमणूक केली गेली आहे. देशातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत फक्त माझ्याबद्दलच नाही तर सरकारने आजवर केलेल्या विकासकामांबद्दलची योग्य माहिती पोहचवण्याचा प्रयत्न फेसबुकच्या माध्यमातून करणार असल्याची माहिती कबिल सिब्बल यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2014 2:23 am

Web Title: kapil sibal to take on rivals through facebook
Next Stories
1 देशभरात एकाच दिवसात ७४ लाख मतदारांच्या नोंदणीचा उच्चांक
2 जम्मू-काश्मीरमधील विशिष्ट भागात इंटरनेट व मोबाइल सेवेवर बंदी घाला
3 दहशतवादी कारवायांसाठी पैसा पुरवल्याप्रकरणी सलाहउद्दीनसह १० जणांविरोधात गुन्हा दाखल
Just Now!
X