06 July 2020

News Flash

अरविंद केजरीवालांचे धरणे आंदोलन

भारती यांच्यावर झालेला हल्ला म्हणजे वाराणसीत 'आप'ला मिळणाऱ्या वाढत्या पाठिंब्यामुळे भाजपला आलेल्या वैफल्याचे द्योतक असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.

| April 24, 2014 11:22 am

आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल सोमनाथ भारती यांना भाजप कार्यकर्त्यांकडून झालेल्या मारहाणीविरोधात धरणे आंदोलनला बसले आहेत. या हल्ल्याचा निषेध करताना भारती यांच्यावर झालेला हल्ला म्हणजे वाराणसीत ‘आप’ला मिळणाऱ्या वाढत्या पाठिंब्यामुळे भाजपला आलेल्या वैफल्याचे द्योतक असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. नरेंद्र मोदींना अभिप्रेत देशभरात अशाचप्रकारे ‘गुजरात मॉडेल’ राबवायचे आहे का अशी विचारणा केजरीवाल यांनी केली. दरम्यान आज(गुरूवारी) नरेंद्र मोदी वाराणसी मतदारसंघातून अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. देशातील सर्वात प्रतिष्ठेती लढत म्हणून सगळ्यांचे वाराणसी मतदारसंघाकडे लक्ष लागले आहे. नरेंद्र मोदी हे वाराणसीत दाखल झाले असून या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी प्रचंड प्रमाणात गर्दी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2014 11:22 am

Web Title: kejriwal on dharna against attack on bharti
Next Stories
1 फक्त २० दिवस… आम्ही बदला घेऊ – नरेंद्र मोदी
2 एल-निनोचा फटका; यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज
3 देशात नरेंद्र मोदींची लाट नाही – मनमोहन सिंग
Just Now!
X