News Flash

केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन करोना पॉझिटिव्ह

कोझिकोड येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले जाणार

संग्रहीत

केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी स्वतः ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून अद्याप कोणताही त्रास होत नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री कार्यालयातील सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिनरायी विजयन हे उथ्तर केरळमधील कन्नूर येथील आपल्या घरी आहेत. त्यांना कोझिकोड येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले जाणार आहे. दरम्यान, मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःच्या आरोग्याचे निरीक्षण करावे, अशी विनंती देखील मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी केली आहे.

केरमळमध्ये मागील काही आठवड्यांपासून करोनाबाधितांची संख्या मोठ्याप्रमाणावर आढळून येत आहे. या अगोदर विजयन यांची मुलगी वीणा विजयन आणि जावई पी ए मोहम्मद रियास हे करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते. विधानसभा निवडणूक प्रचारासाठी विजयन यांनी राज्यभर फिरून प्रचार केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2021 8:46 pm

Web Title: kerala chief minister pinarayi vijayan corona positive msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 देशात सगळ्यांना करोना लस देणं शक्य आहे का? सीरमचे सीईओ अदर पूनावाला म्हणतात…!
2 “करोना लसीसाठीचा कच्चा माल अमेरिका, युरोपनं थांबवला”; सीरम इन्स्टिट्यूटच्या अदर पूनावालांची माहिती!
3 काशी विश्वनाथ मंदिर- ज्ञानवापी मशीद वाद : न्यायालयाने पुरातत्व खात्याला दिली सर्वेक्षणाची परवानगी
Just Now!
X