राज्याच्या विभाजनासारखा संवेदनशील प्रश्न केंद्र शासनाने झटपट गुंडाळून टाकण्याचा प्रयत्न केल्यानेच गुरुवारी संसदेत अभूतपूर्व गदारोळ झाला, अशी टीका आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एऩ  किरण कुमार रेड्डी यांनी केली आह़े  सुरुवातीपासूनच या विषयाला केंद्राने पुरेसा न्याय दिलेला नाही, त्याचाच परिणामस्वरूप हा दुर्दैवी प्रसंग घडला आहे, असेही रेड्डी म्हणाल़े या घटनेनंतर पंतप्रधानांनी म्हटले की, अशा घटनांमुळे त्यांचे हृदय कळवळत़े  मात्र केंद्र शासनाच्या लोकशाहीबाह्य कृत्यांमुळे कोटय़वधी तेलुगू जनतेचे हृदय किती हेलावत असेल, हे पंतप्रधानांनी लक्षात घ्यायला हवे, असेही रेड्डी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितल़े विभाजनाचे विधेयक  सादर करणे हे लोकशाहीविरोधी कृत्य असल्याचेही ते म्हणाल़े