मागच्या २४ तासात देशभरात आणखी किती जणांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. आतापर्यंत किती जणांचा मृत्यू झाला आहे. सुरक्षा उपकरणे, मास्क, व्हेंटिलेटर या आघाडीवर काय स्थिती आहे ते सर्व जाणून घ्या…

करोनाचे किती नवे रुग्ण, किती जणांचा मृत्यू
संपूर्ण देशात आतापर्यंत ५,७३४ नागरिकांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. मागच्या २४ तासात ५४९ जणांचा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ४७३ जण करोना मुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला आहे. करोना व्हायरसमुळे देशात १६६ जणांचा मृत्यू झाला आहे. कालपासून १७ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली.

४९ हजार व्हेंटिलेटर्सची ऑर्डर
करोना व्हायरसपासून बचाव करणारी उपकरणे, मास्क आणि व्हेंटिलेटर्सचा पुरवठा सुरु झाला आहे. देशातीलच २० उत्पादक पीपीईची निर्मिती करणार आहेत. ४९ हजार व्हेंटिलेटर्सची ऑर्डर देण्यात आली आहे. अशी माहिती लव अग्रवाल यांनी दिली.

रेल्वेचे डॉक्टर, स्टाफही करणार मदत
करोना व्हायरसविरोधातील लढाईसाठी रेल्वेने त्यांचे २५०० हजार डॉक्टर आणि ३५ हजार वैद्यकीय सहाय्यकांची फौज सज्ज ठेवली आहे. रेल्वेची सर्व रुग्णालयेही मदत कणार आहेत. लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली.

८० हजार आयसोलेशन बेड
भारतीय रेल्वे ८० हजार आयसोलेश बेड सज्ज ठेवणार आहे. रेल्वे ५ हजार डबे आयसोलेश वॉर्डमध्ये बदलणार आहे. त्यातले ३२५० डबे आधीच आयसोलेशन वॉर्डमध्ये बदलले आहेत.