कुडनकुलम अणुशक्ती प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात वीज निर्मिती सुरू झाली आहे, गेले दोन महिने तो तांत्रिक कारणास्तव बंद होता. हा प्रकल्प आता पुन्हा सुरू झाला असून आजपर्यंत ७५० मेगावॉट वीजनिर्मिती झाली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कुडनकुलम प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम काल सुरू झाले व काल सायंकाळपर्यंत ६०० मेगावॉट वीज उत्पादन झाले होते, असे प्रकल्प संचालक आर.एस.सुंदर यांनी सांगितले. या प्रकल्पातील टर्बाईन आता चांगली करण्यात आली असून उद्यापर्यंत वीजनिर्मिती १००० मेगावॉटपर्यंत जाईल असे सांगण्यात आले.
या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज दक्षिण वीज जालकात टाकली जाईल. कुडनकुलम प्रकल्प-१ हा रशियाच्या सहकार्याने येथे बांधण्यात आला असून जून २०१४ पर्यंत तो मोठय़ा क्षमतेने सुरू होता. आतार्पयंत २८२५ मेगावॉट वीज निर्माण झाली आहे. प्रकल्प दोन सुरू होण्याच्या मार्गावर आहे.