पूर्व लडाखच्या गलवाण खोऱ्यात तैनात असलेल्या भारतीय जवानांच्या हालचाली टिपण्यासाठी  चिनी लष्कराने ड्रोन्सचा वापर केला. १५ जूनच्या रात्री गलवाणमध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये मोठी चकमक झाली. भारताचे २० जवान या हल्ल्यात शहीद झाले तर चीनच्या बाजूला ४० पेक्षा जास्त सैनिक ठार झाल्याची माहिती आहे.

नियंत्रण रेषेवर निर्माण झालेला तणाव कमी करण्याची प्रक्रिया सुरु असताना ही चकमक झाली. या संघर्षामध्ये दोन्ही बाजुंनी एकही गोळी चालवण्यात आलेली नाही असे भारतीय लष्कराने स्पष्ट केले आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

सीमेवर भारताबरोबर आणखी संघर्ष नको – चीन

गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीनंतर चीनने आता नरमाईची भूमिका घेतली आहे. सीमेवर भारताबरोबर आम्हाला आणखी संघर्ष नकोय असे त्यांनी म्हटले आहे. सोमवारी रात्री झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले तर चीनच्या बाजूलाही मोठी जिवीतहानी झाली. त्यांचे ४० पेक्षा जास्त सैनिक मारले गेले. सीमेवर निर्माण झालेली परिस्थिती दोन्ही देश चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करतायत असे चीनने म्हटले आहे.