जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या (जेएनयूएसयू) निवडणुकीत एआयएसए, एसएफआय, एआयएसएफ, डीएसएफ या डाव्या विद्यार्थी गटांच्या संयुक्त संघटनेने सर्वच्या सर्व म्हणजे चारही मध्यवर्ती समिती पदांवर विजय मिळविला आहे, असे निवडणूक समितीने मंगळवारी जाहीर केले.

या गटाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार आइशी घोष यांनी अभाविपच्या मनीष जांगीड यांचा पराभव केला. घोष यांना २३१३ तर जांगीड यांना ११२८ मते मिळाली.

साकेत मून यांची जेएनयूएसयूच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. त्यांनी अभाविपच्या श्रुती अग्निहोत्री यांचा पराभव केला. दिल्ली उच्च न्यायालयाने निवडणूक समितीला निकाल जाहीर करण्याचा आदेश दिला.