News Flash

स्वयंपाकाचा गॅस पुन्हा २५ रुपयांनी महाग

१४.२ किलोच्या गॅस सिलिंडरचा दर प्रति सिलिंडर १२५ रुपयांनी वाढला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

 

देशासह राज्यात पेट्रोल-डिझेलच्या दराने शंभरी गाठल्याने सर्वसामान्यांना आधीच फटका बसलेला असताना आता एलपीजी सिलिंडरच्या दरात सोमवारी प्रति सिलिंडर २५ रुपयांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे आता १४.२ किलोच्या गॅस सिलिंडरचा दर प्रति सिलिंडर १२५ रुपयांनी वाढला आहे.

यापूर्वी ४ फेब्रुवारी रोजी २५ रुपये दरवाढ करण्यात आली होती, त्यानंतर १५ फेब्रुवारी रोजी ५० रुपये दरवाढ करण्यात आली आणि त्यानंतर पुन्हा २५ फेब्रुवारी रोजी २५ रुपये वाढ करण्यात आली. जवळपास एका महिन्यात करण्यात आलेली ही चौथी दरवाढ आहे. दिल्लीत आता एलपीजीच्या १४.२ किलोच्या सिलिंडरचा दर ८१९ रुपये इतका झाला आहे. हवाई इंधनातही ६.५ टक्क्यांनी दरवाढ झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2021 12:30 am

Web Title: lgp again expensive by rs 25 abn 97
Next Stories
1 देशात लस नोंदणी ‘पोर्टल’च्या माध्यमातून
2 दररोज ३३ कि.मी. रस्तेबांधणीचा विक्रम
3 फास्टॅगमुळे वार्षिक २० हजार कोटींची बचत
Just Now!
X