कोणाशीही लघुसंदेशांच्या माध्यमातून बोलत असताना समोरच्याने मध्येच एखादा विचित्र विराम घेतला तर त्याबद्दल लगेचच संशय घ्यायला हवा़  कारण प्रतिसाद देण्याला उशीर करणारी व्यक्ती खोटे बोलत असते, असे नव्या संशोधनातून पुढे आले आह़े
येथील ब्रिगाम विद्यापीठात या संदर्भात झालेल्या संशोधनात ही बाब स्पष्ट झाली़  सोशल मीडिया किंवा त्वरित संदेशवहन करणाऱ्या सॉफ्टवेअरवरून पाठविण्यात येणाऱ्या डिजिटल संदेशातून जेव्हा एखाद्याला खोटे बोलायचे असेल तेव्हा ती व्यक्ती नेहमीपेक्षा उशिराने प्रतिसादाचे संदेश पाठवत़े  तसेच अधिक वेळा त्यात सुधारणा करते आणि हे संदेश नेहमीपेक्षा लहानही असतात, असे निरीक्षण या संशोधनाच्या निष्कर्षांत नोंदविण्यात आले आह़े
डिजिटल संवाद हे धूर्ततेसाठी अगदी अनुकूल वातावरण असत़े  कारण या माध्यमात लोक त्यांची ओळख सहज लपवू शकतात़  तसेच त्यांचे बोलणे काही विश्वासार्ह वाटू शकते, असे याबाबत बोलताना बीवाययूच्या माहिती यंत्रणेचे प्राध्यापक टॉम मेसेव्‍‌र्ही यांनी सांगितल़े
दुर्दैवाने स्पष्टीकरण शोधण्यात मनुष्य कमकुवत आह़े  माणूस केवळ ५४ टक्क्यांपर्यंतच खोटे शोधू शकतो़  त्यातही डिजिटल संदेशांमध्ये समोरच्या व्यक्तीचा आवाज किंवा हावभाव दिसत नसल्यामुळे खोटे शोधणे अधिक अवघड होऊन बसते, असेही टॉम म्हणाल़े
विद्यापीठातील अनेक सहाकाऱ्यांसोबत टॉम यांनी ऑनलाइन खोटारडेपणा तपासण्यासाठी काही संकेत शोधून काढल़े  त्यासाठी त्यांनी एक यंत्रणाच राबविली़  त्यांनी एक संगणक प्रोग्रॅम तयार केला आणि या संशोधनात भाग घेतलेल्यांशी संगणकाच्या माध्यमातून संवाद सुरू केला़  दोन विद्यापीठांतील १००हून अधिक विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला होता़  यात संगणकाकडून विद्यार्थ्यांना प्रत्येकी ३० प्रष्टद्धr(२२४)्ना विचारण्यात आल़े  विद्यार्थ्यांना निम्म्या प्रष्टद्धr(२२४)्नाांची उत्तरे खोटी देण्यास सांगण्यात आले होत़े  ही खोटी उत्तरे देताना त्यांना १० टक्के अधिक वेळ लागला़  तसेच उत्तरात त्यांना अनेकदा खाडाखोडही करावी लागली़