News Flash

लातूरमध्ये भाजपाने उमेदवार बदलला, नगरमधून सुजय विखेंना तिकीट

लातूरमधील विद्यमान खासदार सुनील गायकवाड यांचे नाव कापण्यात आले आहे. या मतदारसंघातून लातूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

डॉ. सुजय विखे

मोठ्या प्रतिक्षेनंतर भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील १५ जणांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. अपेक्षेप्रमाणे नगरमध्ये काँग्रेसमधून भाजपात आलेले डॉ. सुजय राधाकृष्ण विखे-पाटील यांचे नाव जाहीर झाले आहे. बहुतांश ठिकाणी भाजपाने विद्यमान खासदारांची नावे कायम ठेवली आहेत. मात्र ज्या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्या माढा मतदारसंघातील उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही.  विशेष म्हणजे लातूरमधील विद्यमान खासदार सुनील गायकवाड यांचे नाव कापण्यात आले आहे. या मतदारसंघातून लातूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पहिल्या यादीत हा एकमेव बदल दिसून आला आहे. जालन्यातून प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे तर धुळेमधून केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांना तिकीट देण्यात आले आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघाचाही तिढा अजून सुटलेला नाही. विद्यमान खासदार शरद बनसोडे यांचे तिकीट कापले जाणार असल्याचे बोलले जात आहे.

खासदार किरीट सोमय्या यांच्या नावाबाबत अजून गूढ कायम आहे. या यादीत त्यांचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. शिवसेनेच्या त्यांच्या नावाला प्रचंड विरोध असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे पहिल्या यादीत त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही.

 

महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे:

नागपूर- नितीन गडकरी

 

मुंबई उत्तर- गोपाळ शेट्टी

 

मुंबई उत्तर मध्य- पूनम महाजन

 

अहमदनगर- डॉ. सुजय विखे-पाटील

 

धुळे- सुभाष भामरे

 

बीड- प्रीतम मुंडे

 

सांगली- संजय पाटील

 

अकोल- संजय धोत्रे

 

नंदूरबार- हीना गावित

 

लातूर- सुधाकर शृंगारे

 

वर्धा- रामदास तडस

 

गडचिरोली- अशोक नेते

 

चंद्रपूर- हंसराज आहिर

 

जालना- रावसाहेब दानवे

 

भिवंडी- कपिल पाटील

 

रावेर- रक्षा खडसे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2019 7:53 pm

Web Title: lok sabha election 2019 bjp declared first list of candidate sujay vikhe poonam majahan raksha khadse
Next Stories
1 नरेंद्र मोदी वाराणसी, अमित शाह गांधीनगर तर गडकरींना नागपूरमधून उमेदवारी
2 चौकीदार नको, प्रामाणिक पंतप्रधान हवा आहे: असदुद्दीन ओवेसी
3 रामगोपाल यादव यांचं वक्तव्य घाणेरड्या राजकारणाचं उदाहरण – योगी आदित्यनाथ
Just Now!
X