द्रमुक अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री एम. करूणानिधी यांची प्रकृती स्थिर आहे. काळजीचे कोणतेही कारण नाही. रुग्णालयातून त्यांना घरी पाठवण्यात आले असून तिथेच त्यांच्यावर सर्व उपचार केले जात आहेत, अशी माहिती द्रमुकचे कार्याध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी दिली. ‘द्रमुक’चे प्रमुख आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांची प्रकृती किंचितशी खालावली असल्याचे रुग्णालय व्यवस्थापनाने सांगितले होते. त्यानंतर लोकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहनही स्टॅलिन यांनी केले.

करुणानिधी हे ९६ वर्षाचे असून वयोमानानुसार त्यांची प्रकृती खालावली असल्याचे कावेरी रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगण्यात आले होते. करुणानिधी हे मूत्रपिंडाच्या संसर्गाच्या आजाराने ग्रस्त आहेत. त्यामुळे त्याची प्रकृती बिघडली आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती कावेरी रुग्णालयाच्या वैद्यकीय बुलेटिनमधून देण्यात आली आहे.

करुणानिधी यांना ऑक्सिजनचा पुरवठा करणारी नलिका बदलण्यासाठी कावेरी रुग्णालयाच्या युनिटकडे नेण्यात आले होते. मात्र सध्या वैद्यकीय पथकाकडून करुणानिधी यांच्या निवासस्थानीच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत आणि रुग्णालयातील सेवांप्रमाणे वैद्यकीय सेवा त्यांना पुरवण्यात येत असल्याचीही माहिती रुग्णालय व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.

<blockquote class=”twitter-tweet” data-lang=”en”><p lang=”en” dir=”ltr”>There has been a decline in the health of DMK President M Karunanidhi&#39;s due to age related ailments. He is being treated for fever due to urinary tract infection. He is being given hospital level treatment at home: Kauvery Hospital (file pic) <a href=”https://t.co/b3SaOR5qBt”>pic.twitter.com/b3SaOR5qBt</a></p&gt;; ANI (@ANI) <a href=”https://twitter.com/ANI/status/1022481659168481281?ref_src=twsrc%5Etfw”>July 26, 2018</a></blockquote>
<script async src=”https://platform.twitter.com/widgets.js&#8221; charset=”utf-8″></script>

दरम्यान, रात्री उशिरा उपमुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांच्यासह काही अन्य मंत्र्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन करुणानिधी यांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यानंतर पन्नीरसेल्वम यांनीही करुणानिधी यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले.