या वर्षाच्या सुरुवातीला OIC मध्ये भारताच्या बाजूने उभे राहिल्यानंतर मालदीवने गुरुवारी सार्क परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत पुन्हा एकदा भारताला साथ दिली. १९ व्या सार्क परिषदेचे आयोजन पाकिस्तानात करण्याचा प्रस्ताव आला होता. पण हा प्रस्ताव रोखण्यात मालदीवने भारताला साथ दिली.

आणखी वाचा- भारत-इस्रायलमध्ये अत्यंत महत्त्वाचा करार, चीन-पाकिस्तानचं टेन्शन वाढणार

२०१६ साली सार्क परिषद स्थगित करण्यात आली होती. त्यावर्षी पाकिस्तानात या परिषदेचा संयोजक होता. पण उरीमध्ये भारताच्या सैन्य तळावर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यामुळे भारताने त्यावर्षीच्या सार्क परिषदेवर बहिष्कार घातला. परिषदेतील अन्य देशांनी सुद्धा भारताला साथ देत सार्कमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

आणखी वाचा- आरोप करणाऱ्या पाकिस्तानला भारतानं सुनावलं; POK वरील अवैध ताबा सोडा

“१९ व्या सार्क परिषदेच्या आयोजनावर सहमती घडवून आणण्यासाठी पोषक वातावरण निर्मिती केली पाहिजे. सध्याच्या स्थितीत आपण करोना व्हायरसच्या साथीचा सामना करत आहोत. त्यामुळे सार्क परिषदेवर चर्चा करण्याची ही योग्य वेळ आहे, असे वाटत नाही” असे मालदीवच परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला शाहीद म्हणाले. मालदीवच्या भूमिकेमुळे या प्रस्तावावर पुढे चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे सार्क परिषदेचे यजमानपद मिळवण्याची पाकिस्तानची योजना धुळीस मिळाली.