News Flash

‘स्विगी मॅन’ मुस्लिम असल्याने जेवण न स्वीकारणाऱ्या ग्राहकाविरोधात गुन्हा दाखल

अजय कुमार या ग्राहकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

संग्रहित प्रतिकात्मक छायाचित्र

स्विगी किंवा झोमॅटो यांच्यासारख्या फूड चेन वेबसाईट्सवरुन जेवण किंवा खाद्यपदार्थ मागवणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अशातच हैदराबाद येथील एका ग्राहकाने स्विगी डिलिव्हरी मॅन मुस्लिम आहे म्हणून त्याच्याकडचं अन्न घेण्यास नकार दिला होता. याप्रकरणी या ग्राहकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय कुमार या हैदराबाद येथील माणसाने स्विगीवरुन जेवण मागवलं होतं. त्यावेळी त्याच्या जेवणाची डिलिव्हरी घेऊन आलेला माणूस मुस्लिम होता म्हणून त्याने हे जेवण स्वीकारण्यास नकार दिला.

स्विगीकडे त्याने तुम्ही हिंदू डिलिव्हरी बॉय पाठवा अशी मागणी त्याने केली होती. दरवाजात अन्न घेऊन आलेल्या माणसाला तो मुस्लिम आहे म्हणून अजय कुमार या ग्राहकाने परत पाठवले होते. आता याच प्रकरणी पोलिसांनी अजय कुमारविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुदासिर नावाच्या डिलिव्हरी बॉयने त्याला अन्न आणून दिले मात्र मी मुस्लिम माणसाच्या हातून अन्न घेणार नाही असे म्हणत अजय कुमारने ही ऑर्डर नाकारली. याप्रकरणी अजयकुमार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2019 5:25 pm

Web Title: man booked for not accepting food from muslim delivery agent scj 81
Next Stories
1 हरयाणात भाजपा सरकार, मनोहर लाल खट्टर रविवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ
2 मोदींच्या गुजरातमध्येही काँग्रेस सोडून भाजपा गेलेल्या दोन मोठ्या नेत्यांचा झाला पराभव
3 दहा जागा जिंकणाऱ्या जेजेपीला भाजपानं दिलं उपमुख्यमंत्रीपद; शिवसेनेचं काय होणार?
Just Now!
X