धारदार धोरणांसह ब्रिटनच्या राजकीय पटलापासून ते समाजजीवनापर्यंत ठोस प्रभाव पाडणाऱ्या करारी नेत्या आणि विन्स्टन चर्चिल यांच्याइतका वकूब आणि आदर लाभलेल्या ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांचे सोमवारी येथे पक्षाघाताने निधन झाले. त्या ८७ वर्षांच्या होत्या. ‘पोलादी स्त्री’ म्हणून ओळख असलेल्या मार्गारेट थॅचर मुक्त बाजारपेठेच्या कट्टर पुरस्कर्त्यां होत्या.  
श्रीमती थॅचर या त्यांच्या रोखठोक व्यवहार आणि स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध होत्या. टोकाची टीका आणि मतदारांचा भरभरून मिळालेला पाठिंबा या दोन्हीचा अनुभव त्यांनी त्यांच्या वादळी कारकिर्दीत घेतला. ब्रिटनचे राजकारण १९७९ ते १९९० या अकरा वर्षांमध्ये त्यांच्याभोवती फिरत होते. या काळात त्या ब्रिटनच्या पंतप्रधान होत्या. इतका प्रदीर्घ काळ ब्रिटनचे सर्वोच्च राजकीय पद भूषविणाऱ्या त्या विसाव्या शतकातील अद्वितीय राजकीय नेत्या होत्या. ब्रिटनच्या त्या आतापर्यंतच्या एकमेव महिला पंतप्रधान होत.
हुजूर पक्षाच्या खासदार म्हणून त्या उत्तर लंडनमधील फिंचले येथून १९५९ मध्ये प्रथम निवडून आल्या. सुमारे तीन दशकांची त्यांची संसदीय कारकीर्द १९९२ मध्ये त्या हाउस ऑफ कॉमन्समधून निवृत्त झाल्याने संपुष्टात आली. त्यांचे मूळ नाव मार्गारेट रॉबर्ट्स. शिक्षणमंत्री असताना त्यांनी त्यांच्या महत्त्वाकांक्षेची चुणूक दाखविली. त्यांनी १९७५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान एडवर्ड हीथ यांच्या नेतृत्वाला आव्हान दिले होते. त्यांची ही बंडखोरी यशस्वी ठरली आणि नंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांनी १९७९, १९८३ व १९८७ अशा तीन वेळा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये त्यांनी हुजूर पक्षाला भरघोस यश मिळवून दिले. पंतप्रधान असताना थॅचर यांनी खासगीकरणाची प्रक्रिया धडाडीने राबविली. सरकारी मालकीच्या अनेक उद्योगांचे त्यांनी खासगीकरण केले.  कामगार संघटनांचे वर्चस्व त्यांनी मोडीत काढले. या संदर्भात झालेल्या टीकेला त्या पुरून उरल्या.  फॉकलंड बेटांच्या मुद्दय़ावर १९८२ मध्ये अर्जेटिनाशी झालेल्या युद्धाच्या वेळी त्यांच्या नेतृत्वगुणांची चमक साऱ्या जगाला दिसली.

rajeev chandrasekhar vs shashi tharoor
तिरुवनंतपूरममध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या उमेदवारीनं शशी थरूर यांच्यासमोर आव्हान; मतदारसंघात कोणाचा होणार विजय?
Orenthal James Simpson
स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे?
ED and CBI have been the operatives of Narendra Modi in the country for the last 10 years says nana patole
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ईडी व सीबीआय हे कार्यकर्ते; नाना पटोले म्हणतात, “त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये…”
Benjamin Basumatary sleeping on cash
नोटांच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या नेत्याचा फोटो व्हायरल; भाजपाच्या मित्रपक्षाने म्हटले…